विधानसभेपूर्वीच शरद पवारांचा पक्ष फुटला, नाराज नेत्याचा मोठा धक्का

मोठी बातमी समोर येत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इंदापुरात घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यानं दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभेपूर्वीच शरद पवारांचा पक्ष फुटला, नाराज नेत्याचा मोठा धक्का
शरद पवार
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 7:14 PM

इंदापूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे इंदापूर दौऱ्यावर होते. मात्र शरद पवार यांचा दौरा आटोपताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला या मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नाराज नेते अप्पासाहेब जगदाळे यांनी शरद पवार यांची साथ सोडत इंदापूरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीवरून जगदाळेंनी नाराजी व्यक्त केली होती. जनतेसमोर खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला साथ देणार नाही, असं जगदाळे यांनी म्हटलं होतं, त्यानंतर आज त्यांनी भरणे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे इंदापुरात घडामोडींना वेग आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षातील नाराज असलेले इंदापुरातील पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळेंनी मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. आप्पासाहेब जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा देणार आहेत.

आप्पासाहेब जगदाळे आता अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत. शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात जगदाळे हे आता दत्तात्रय भरणे यांचा प्रचार देखील करणार आहेत. जनतेसमोर खोटं बोलणार्‍या व्यक्तीला साथ देणार नसल्याच सांगत त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. जगदाळे यांच्या या भूमिकेमुळे इंदापुरात शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

आज शरद पवार हे इंदापुरच्या दौऱ्यावर होते. हर्षवर्धन पाटील यांना तिकीट दिल्यामुळे नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. शरद पवार यांनी भरत शाह यांची भेट घेलती. मात्र त्यांनी आपल्या या दौऱ्यामध्ये आप्पासाहेब जगदाळे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार प्रवीण माने यांची भेट घेणं टाळलं. त्यानंतर लगेचच जगदाळे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. हा हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.