“हा खेळ महाराष्ट्राला जाळून टाकेल”; जितेंद्र आव्हाड यांनी नाशिकच्या घटनेवरून फटकारले

महंत रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

हा खेळ महाराष्ट्राला जाळून टाकेल; जितेंद्र आव्हाड यांनी नाशिकच्या घटनेवरून फटकारले
जितेंद्र आव्हाड यांचा विरोधकांवर पलटवार
Follow us
| Updated on: Aug 17, 2024 | 1:38 PM

Jitendra Awhad On Ramgiri Maharaj Controversy Statement : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकमधील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनादरम्यान एका धर्माविषयी वक्तव्य केले होते. या प्रवचनातील त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील काही ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. इतकंच नाहीतर तर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. आता यावर राष्ट्रवादी शरद पवरा गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाष्य केले आहे. महाराष्ट्रातील धार्मिक तसेच सामाजिक स्वास्थ्य त्यानिमित्ताने हे सत्ताधारी बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे आता लपून राहिलेले नाही, असे टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“काल महंत रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांना अपमानित करणारे, त्यांचे चारित्र्य हनन करणारे विधान मुद्दामहून केले, असे माझे मत आहे. कारण, कोणत्याही महंताने कोणत्याही प्रेषिताबाबत असे उद्गार काढणे अशक्य आहे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेत तुम्ही कोणत्याही संतसाहित्य उघडून बघा; संतांच्या अभंगांचे पुस्तक उघडून बघा; संत कबीर, संत रविदास, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पुस्तके उघडून बघा, तुम्हाला कुठेही धर्मद्वेष दिसणार नाही. किंबहुना, या सर्वांची शिकवणच होती की,सर्व धर्मांनी एकत्र राहिले पाहिजे. असे असताना महंत रामगिरी हे ज्या पद्धतीने बोलले आहेत; त्याकडे पाहता , हे शब्द मुद्दामहून त्यांच्याकडून वदवून घेण्यात आले, असेच होते. मी जे म्हणतोय त्याला अर्थ आहे.

कारण, मागे स्वतः मुख्यमंत्री बसलेले असताना, हे महंत एवढे बोलण्याची हिमंत दाखवत असतील तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असू शकते. ते जाऊ द्या ! पण, महाराष्ट्रातील धार्मिक तसेच सामाजिक स्वास्थ्य त्यानिमित्ताने हे सत्ताधारी बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे आता लपून राहिलेले नाही. हा खेळ आता महाराष्ट्राला जाळून टाकेल; महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडवून टाकेल अन् हा खेळ महाराष्ट्राला परवडणार नाही. सत्ता येते अन् जाते. पण, एकदा मने दुभंगली की ती जोडता – जोडता आयुष्य निघून जाते. या द्वेषाच्या राजकारणापासून आपण सर्वांनीच लांब रहायला हवे”, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

महंत रामगिरी महाराज यांचे वक्तव्य काय?

177 वर्षांपूर्वी या सप्ताहाला सुरुवात झाली होती. 20 ते 25 लाख लोक येथे येतात. अखंड भजनात तल्लीन होतात. लोकांना भक्ती मार्गाला लावण्यासाठी या सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही करतो. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. एक ते दीड कोटी लोक बॉर्डरवर उभे आहेत. भारतामध्ये प्रवेश मागत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना आम्ही सांगितले हिंदूंनी मजबूत राहिले पाहिजे. अन्यायाला प्रतिकार केला पाहिजे, असे वक्तव्य महंत रामगिरी महाराज यांनी केले.

महंत रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी महंत रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.