मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? शरद पवार स्पष्टच म्हणाले…

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवारांनी महाविकासाआघाडीत कोण मुख्यमंत्री होणार? मुख्यमंत्रि‍पदाचा फॉर्म्युला कसा ठरणार याबद्दल सांगितले आहे.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? शरद पवार स्पष्टच म्हणाले...
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 12:22 PM

Sharad Pawar Om CM Formula : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुती आणि महाविकाआघाडीत जोरदार मोर्चेंबांधणी सुरु आहे. त्यातच आता महाविकासआघाडीकडून मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असणार याबद्दल विविध चर्चा रंगत आहेत. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवारांनी महाविकासाआघाडीत कोण मुख्यमंत्री होणार? मुख्यमंत्रि‍पदाचा फॉर्म्युला कसा ठरणार याबद्दल सांगितले आहे.

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी केली होती. शरद पवार आणि काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा सांगावा, आपण त्याला पाठिंबा देऊ, असं उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. आता नुकतंच कोल्हापुरात एक पत्रकार परिषद पार पड”ली. या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी महाविकासआघाडीत मुख्यमंत्रि‍पदाचा फॉर्म्युला कसा असणार याबद्दल भाष्य केले आहे. नेतृत्व कोणी करायचं हे निवडणूक झाल्यानंतर संख्याबळ ठरवून निर्णय घेऊ, असे शरद पवारांनी यावेळी म्हटले.

“लाडकी बहीण योजनेवरुन जर सरकारमध्ये वाद होत असतील तर ती चांगली गोष्ट आहे. येत्या दोन महिन्यांनी आम्हाला लोकांच्या समोर जायचं आहे. आम्ही वेगवेगळ्या पक्षांचे सहकारी असलो, तरी एका विचाराने जनतेसमोर जाणार आहोत. हे बाकीचे लाडके या पद्धतीने जाणार ही चांगली गोष्ट आहे”, असा टोला शरद पवारांनी लगावला.

“आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही”

“मुख्यमंत्रिपदाचं घोडं अजिबात कुठेही अडलेलं नाही. असा विचार करण्याचे काहीही कारण नाही. अनेक वेळेला असं घडलंय की नेतृत्व कोणी करायचं हे निवडणूक झाल्याच्या नंतर संख्याबळ ठरवून निर्णय घ्यायचा असतो. आता अजून निवडणुकांचा पत्ता नाही. राज्यात बहुमत मिळेल असं वातावरण आहे, त्याबद्दल शंका नाही. पण त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही”, असे शरद पवार म्हणाले.

एक स्थिर सरकार या राज्यात आणू

“मी तुम्हाला यापूर्वीचं एक उदाहरण सांगतो, १९७७ साली आणीबाणीच्या नंतर निवडणूक झाली, त्या निवडणुकीवेळी कोणाताही चेहरा नव्हता. जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहन केले. एकत्र आले, निवडणुका लढल्या, निकाल लागल्यानंतर मुरारजी देसाई यांचं नाव जाहीर केलं गेलं. निवडणुकीत मतं मागताना कधीही मुरारजी देसाई यांचं नाव जाहीर केलेलं नव्हतं. त्यामुळे आताच नाव जाहीर केलं पाहिजे, हा आग्रह करण्याची आवश्यकता नाही. आम्ही नक्की एकत्र बसू, एका विचाराने लोकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर एक स्थिर सरकार या राज्यात आणू”, असेही शरद पवारांनी म्हटले.

'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.