धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे का? भाजपसोबत गेलं पाहिजे का?, दोन प्रश्न; शरद पवार यांचं थेट उत्तर काय?

वाल्मिक कराडवरही मोक्का लावावा अशी मागणी केली जात आहेत. त्यातच आता संतोष देशमुख हत्याप्रकरणी आणि धनंजय मुंडे राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे का? भाजपसोबत गेलं पाहिजे का?, दोन प्रश्न; शरद पवार यांचं थेट उत्तर काय?
sharad pawar dhananjay munde
Follow us
| Updated on: Jan 14, 2025 | 1:48 PM

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे. याप्रकरणी वाल्मिक कराडवरही मोक्का लावावा अशी मागणी केली जात आहेत. त्यातच आता संतोष देशमुख हत्याप्रकरणी आणि धनंजय मुंडे राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना संतोष देशमुख हत्येप्रकरणी विचारणा करण्यात आली. तसेच धनंजय मुंडेंनी याप्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली जात आहे. या प्रकरणी शरद पवारांनी त्यांचे मत व्यक्त केले.

हे महाराष्ट्राला शोभणारं नाही

“संपूर्ण प्रकरणच चिंताजनक आहे. ज्या पद्धतीने हत्या केली. त्यामागचे कोण लोक आहेत याची चर्चा आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. मी पहिल्यांदा भेटायला मीच गेलो होतो. परभणीतही मीच पहिला गेलो होतो. लोकांची प्रतिक्रिया चीड आहे. त्या ठिकाणी सामाजिक तणाव निर्माण होईल असं दिसत होतं. त्यामुळे यातून मार्ग काढण्याची बाब मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. या ठिकाणी राजकारण येऊ नये आणि समाजात एक वाक्यता राहावी ही भूमिका मांडली. दुर्देवाने काही ना काही घडतंय. हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. आमचा दृष्टीकोण सामंजस्य निर्माण करणारा आहे”, असे शरद पवार म्हणाले.

अधिक माहिती गृहखात्याकडे

“माझ्या भूमिकेपेक्षा याचा निकाल राज्याच्या प्रमुखांची घेतला पाहिजे. राज्यात चर्चा काय आहे, याची नोंद त्यांनी घेतली पाहिजे. याप्रकरणाची अधिक माहिती गृहखात्याकडे असली पाहिजे. वस्तुस्थिती पाहून राज्यकर्त्यांनी वातावरण निवळण्यासाठी प्रयत्नाची पराकष्ठा केली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल केली.

“एकाही खासदाराचं असं मत नाही. हा जावई शोध कुणी लावला माहीत नाही. राज्याच्या पक्षाच्या प्रमुखाला तुम्ही पक्ष सोडून जाणार आहात का हे विचारता काही तरी तारतम्य पाळलं पाहिजे”, असेही शरद पवार म्हणाले.

“चार पाच महिन्यात निवडणुका लागतील”

“चार पाच महिन्यात निवडणुका लागतील अशी शक्यता आहे. त्यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाला तयारीला लागावं लागतं. ती प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. साधारण दहा ते बारा दिवसाने पक्षात बदल होतील. अध्यक्ष बाहेर आहेत. ते आल्यावर या गोष्टीला प्राधान्य दिलं जाईल”, असे शरद पवारांनी म्हटले

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...