मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, डी. पी. त्रिपाठी, सुनील तटकरे, शंकरसिंग वाघेला, जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्या नावांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे शिरुर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांचं या यादीत नाव थेट विसाव्या क्रमांकावर आहे. एकूण 40 जणांची ही यादी आहे.
काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला यांचाही यादीत समावेश करण्यात आलाय. ते या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. प्रचारासाठी सर्वच पक्षांकडून स्टार प्रचारकांची नियुक्ती केली जाते, ज्यामध्ये महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश असतो.
पाहा संपूर्ण यादी