Sharad Pawar | राष्ट्रवादी Action मोडमध्ये, लोकसभा निवडणुकीसाठी उद्या ‘इथे’ होणार महत्वाची बैठक
Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसच्या या महत्वाच्या बैठकीला कोण-कोण नेते उपस्थित राहणार?. याखेपेला महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार लोकसभेवर पाठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसलीय.
पुणे : पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपा-शिवसेना महायुती तसच काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. पुण्यातही लोकसभेची पोटनिवडणूक लवकरच होऊ शकते. हा आपला पारंपारिक मतदारसंघ असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. त्याचवेळी मित्रपक्ष राष्ट्रवादीकडून संख्याबळाद्वारे पुण्यातील आपलं वर्चस्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न होतोय.
पोटनिवडणुकीत पुण्याची लोकसभेची जागा कोण लढवणार? ते लवकरच स्पष्ट होईल. आगामी लोकसभा निवडमुकीत महायुतीला रोखण्याची महाविकास आघाडीची रणनिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली
मागच्या दोन लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना महायुतीच वर्चस्व दिसून आलाय. याखेपेला महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार लोकसभेवर पाठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसलीय. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्वाची बैठक होणार आहे.
किती वाजता बैठक?
आगामी महापालिका निवडणूका आणि लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली आहे. उद्या पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत सकाळी 10.30 वाजता बैठक होईल. बैठकीला कोण-कोण उपस्थित राहणार?
शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, सुप्रिया सुळे असे पक्षाचे मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उद्याची बैठक महत्वाची आहे. किती जागा लढवायच्या यावर चर्चा होऊ शकते.