मुंबई : सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीची धूम सुरु आहे. आगामी काळात पुणे, मुंबई तसेच इतर मोठ्या शहरांतील महापालिका निवडणुका लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षबांधणीसाठी पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी महाबळेश्वरला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हजेरी लावणार आहेत.
महाबळेश्वर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आलाय. येत्या 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला शरद पवार तसेच अजित पवार उपस्थित राहणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना स्वतः अजित पवार आणि शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आगामी काळातील महापालिका निवडणुका तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पुढील वाटचाल यावर या दोन दिवसीय मेळाव्यात चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात येईल. विशेष म्हणजे या मेळाव्याचा समारोप 24 नोव्हेंबर रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे मंत्रीदेखील उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, आगामी काळातील महापालिका निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने योजना आखायला सुरु केली आहे. शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या स्थानिक नेत्यांसोबतच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. तसेच मुंबईतदेखील राष्ट्रवादी पक्षबळटीकरणासाठी पावले टाकत आहे. पुणे महापालिकेसाठी राष्ट्रवादीने खास जोर लावल्याचे दिसतेय. काहीही झालं तरी यावेळी राष्ट्रवादीचाच महापौर होणार असा दावा यापूर्वी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी केला आहे.
इतर बातम्या :
अनिल परबांना केबल कनेक्शन देण्याइतकं एसटीचं काम सोप्पं वाटतं का?; राधाकृष्ण विखे-पाटलांची खोचक टीका