मोठी बातमी! राष्ट्रवादीची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त, धनंजय मुंडेंना धक्का? संतोष देशमुख मर्डर प्रकरणानंतर मोठा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यामुळे जिल्हा कार्यकारणी बरखास्त आली आहे.
संतोष देशमुख मर्डर प्रकरणानंतर फक्त बीडच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. मराठवाड्यातील अनेक भागात मोर्चे, आंदोलन सुरू आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना मकोका लावण्यात आला आहे. काही आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अजितदादांनी संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त केली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचं वर्चस्व असून त्यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यामुळे जिल्हा कार्यकारणी बरखास्त आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांचं नाव आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती.यामुळेच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे. तसेच तालुक्याची जी कार्यकारिणी होती, तीदेखील बरखास्त करण्यात आली आहे.
सुनील तटकरे यांनी घेतला मोठा निर्णय
संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे याचं नाव आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. विष्णू चाटे हे केजचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष होते, मात्र या गुन्ह्यात त्याचं नाव आल्यानंतर त्यांना तातडीने निलंबित करण्यात आलं होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अनेक लोकांची चौकशीसुद्धा झाली, त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर सुनील तटकरे यांनी हा महत्वाचा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली. जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण हेच काम पाहतील असं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कळवण्यात आलं आहे. तसेच यापुढे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या अशा सूचना बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत.
काल उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत बिड जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण,माजी आमदार संजय दौंड आणि इतर प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बिड जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीचा आढावा अजित पवार यांनी घेतला. त्याचसोबत वाल्मिक कराड यांना मोक्का लागल्यानंतर परळी बंदची हाक देण्यात आली होती. अनेक हिंस्त्र आंदोलनं कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती, त्यासंदर्भातील माहिती अजित पवार यांनी जाणून घेतली.
धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची घेतली भेट
या बैठकीनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली या भेटीत अजित पवार यांनी बिड जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेतली. या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे परळीसाठी रवाना झाले होते त्यामुळे आज धनंजय मुंडे परळी मधे आज काही भूमिका मांडणार आहेत का? हे पाहणं महत्त्वाच आहे.