राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार फुटला, शरद पवारांना धक्का!

 राष्ट्रवादीच्या केजच्या उमेदवार नमिता मुंदडा (Namita Mundada BJP) यांच्या भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब झालं आहे.

राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार फुटला, शरद पवारांना धक्का!
Follow us
| Updated on: Sep 30, 2019 | 11:27 AM

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक मोठा झटका बसला आहे. कारण पवारांनी जाहीर केलेला बीडचा उमेदवार (Namita Mundada BJP) फुटला आहे.  राष्ट्रवादीच्या केजच्या उमेदवार नमिता मुंदडा (Namita Mundada BJP) यांच्या भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब झालं आहे. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत नमिता मुंदडा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पांगरीच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.

शरद पवार यांनी बीड दौऱ्यात 5 उमेदवार जाहीर केले होते. त्यामध्ये नमिता मुंदडा यांचं नाव होतं. मात्र पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना उमेदवार फुटण्याच्या भीतीने राष्ट्रवादीने बीडमधील उमेदवार जाहीर केल्याचा आरोप केला होता. पंकजांचा हा आरोप आता खरा होताना दिसत आहे.

नमिता मुंदडांची फेसबुक पोस्ट

नमिता मुंदडा यांनी काही दिवसापूर्वी  एक फेसबुक पोस्ट (Namita Mundada Facebook post) केली होती. या फेसबुक पोस्टमधून नमिता यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहे. मात्र यावर राष्ट्रवादीचे चिन्ह किंवा शरद पवारांचा फोटोही (Namita Mundada Facebook post) दिसत नाही. त्यामुळे नमिता मुंदडा भाजपत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

“स्व.डॉ. सौ.विमलताई मुंदडा यांनी गेली 25 वर्षे लोकांच्या हितासाठी पूर्ण आयुष्य दिले, मतदारसंघातील प्रत्येकाशी कौटुंबिक नाते निर्माण करून थेट संपर्क ठेवला. पण मार्च 2012 मध्ये ताई आपल्यामधून अचानक निघून गेल्या. मागील 7 वर्षांपासून आमच्या संपूर्ण कुटुंबाने कुठलेही पद नसताना लोकांच्या हितासाठी काम सुरू ठेवले. हेच नाते आता मला पुढे कायम ठेवून, मतदारसंघाचा विकास करायचा आहे, येत्या विधानसभेसाठी मी उभी राहणार आहे. आपला आशिर्वाद असावा, ही नम्र विनंती,” अशी पोस्ट नमिता मुंदडा यांनी केली होती.

राष्ट्रवादीकडून 5 उमेदवार जाहीर

शरद पवार यांनी बुधवारी (16 सप्टेंबर) बीडमध्ये येऊन राष्ट्रवादीच्या पाच उमेदवारांची (Sharad pawar) घोषणा केली होती. यात नमिता मुंदडा यांचा समावेश होता. नमिता मुंदडा या दिवंगत विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत. शरद पवारांनी जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये परळीतून धनंजय मुंडे, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावमधून प्रकाश सोळके, गेवराईतून विजयसिंह पंडित आणि केजमधून नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली होती.

कोण आहेत नमिता मुंदडा?

नमिता मुंदडा दिवंगत विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत.

दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा या सलग पाच वेळा केज मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

विमल मुंदडा यांनी भाजपातून आपली राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

भाजपकडून 2 वेळा आणि राष्ट्रवादीतून 3 वेळा त्या निवडून आल्या.

तसेच 9 वर्षे त्यांनी विविध खात्याचे मंत्रिपद सांभाळले.

राष्ट्रवादीत असताना मुंदडा कुटुंबाचे वेगळे अस्तित्व होते. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बजरंग सोनावणे यांच्यासोबत मुंदडा कुटुंबाचे कधीच पटले नाही.

2014 ला भाजपच्या उमेदवार संगिता ठोंबरे यांनी 42 हजार 721 मतांनी विजय मिळवला होता. त्यांच्याविरोधात नमिता मुंदडा या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या. पण यावेळी मतदारसंघातील स्थानिक समीकरणं बदलल्याने उत्सुकता वाढली आहे.

संबंधित बातम्या 

शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा भाजपच्या वाटेवर? 

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.