चीन स्पर्धेत असतांनाही भारतानं मारली बाजी, नेपाळचं मोठं कंत्राट मिळालं भारताला, काय आहे कारण ?
चीन आणि फ्रान्स यांच्यासह भारतही या स्पर्धेत होता. मात्र, यामध्ये चीन किंवा फ्रान्स या दोन्ही पैकी कोणत्यातरी एका देशालाच हे कंत्राट मिळेल अशीच शक्यता होती.
नाशिक : जागतिक पातळीवरील कंत्राट (Contract) घेण्यामध्ये नेहमीच चढाओढ असते. त्यात मोठे देश यामध्ये नेहमीच बाजी मारत असतात. त्यामुळे शक्यतो असे कंत्राट हितसंबंधांवरच दिले जातात. त्यामुळे कंत्राट घेण्याची फारशी स्पर्धा होत नाही. मात्र, नव्याने निर्माण झालेले देश यामध्ये कंत्राट काढू लागले आहेत. यामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी नेपाळने नोटा छपाईचे कंत्राट (Nepal Currency Printing Contract) काढले होते. ते कंत्राट मिळवण्यासाठी चीन(China), फ्रान्स आणि भारत (India) मुख्य स्पर्धेत होता. त्यामुळे चीन किंवा फ्रान्स यामध्ये बाजी मारेल अशी स्थिती असतांना भारताने बाजी मारली आहे. असं एकदा नाही तर दोनदा घडलं आहे.
सर्वात पहिले नेपाळने पन्नास रुपयांच्या नोटा छपाईचे कंत्राट काढले होते. ज्यामध्ये चीन आणि फ्रान्स काढून कंत्राट मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न केले गेले होते.
चीन आणि फ्रान्स यांच्यासह भारतही या स्पर्धेत होता. मात्र, यामध्ये चीन किंवा फ्रान्स या दोन्ही पैकी कोणत्यातरी एका देशालाच हे कंत्राट मिळेल अशीच शक्यता होती.
परंतु यामध्ये भारताने चीनसहित फ्रान्सला या स्पर्धेत मागे टाकत बाजी मारली आहे. आणि विशेष म्हणजे नाशिक येथील करन्सी नोट प्रेसला हे काम मिळालं आहे.
पन्नास रुपयांच्या 300 दशलक्ष नोटा छापण्याचे काम भारताला मिळाले असून नाशिक करन्सी नोट प्रेस अर्थात नाशिकरोड येथील चलार्थ पत्र मुद्रणालयाला मिळाले आहे.
ही बाब ताजी असतांनाच नेपाळने पुन्हा एक हजर रुपयांच्या नोटा छपाईचे कंत्राट जाहीर केले होते. पुन्हा यामध्ये चुरस निर्माण झाली होती. चीन सारख्या देशाने यामध्ये अधिकच जोर लावला होता.
आधीचं कंत्राट मिळवण्यातही भारताने बाजी मारल्याने चीनचा विषय चांगलाच जिव्हारी लागला असेल. त्यामुळे दुसरे कंत्राट तरी मिळावे यासाठी चढाओढ लागली असणार यामध्ये शंकाच नाही.
मात्र, दुसरे कंत्राट मिळवण्यातही भारतानेच बाजी मारली असून नाशिकच्या करन्सी नोट प्रेसलाच हे कंत्राट मिळाले असून नुकताच दूसरा करारही झाला आहे.
नेपाळचे दोन्ही कंत्राट मिळाल्यानंतर नाशिक करन्सी नोट प्रेसमधील कामगार नोटा छपाईसाठी सज्ज असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.
करन्सी नोट प्रेसमध्ये नेपाळच्या एकूण 730 दशलक्ष नोटा छापल्या जाणार आहे. एका वर्षात या नोटा करारानुसार छापल्या जाणार आहे. त्यामुळे त्याची लगबग सुरू झाली आहे.
नेपाळचे कंत्राट मिळाल्याचे करन्सी नोट प्रेसच्या मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांच्या वतिने जाहीर करण्यात आले असून करन्सी नोटप्रेसच्या कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.