पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची संपत्ती किती ? पत्नीची शेअरमध्ये तगडी गुंतवणूक
महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार ? याचे सस्पेन्स अखेर बुधवारी संपले आहे. देवेंद्र फडणवीस यांना विधीमंडळ पक्षाचा गट नेता म्हणून निवडल्याने त्यांची मुख्यमंत्री पदी निवड निश्चित झालेली आहे. उद्या गुरुवारी ५ डिसेंबर रोजी देवेंद्र महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतील.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यानंतरही सरकार स्थापन करण्यास मोठा वेळ लागला आहे. अखेर दहा दिवसानंतर महायुतीचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांची आज अखेर भाजपा पक्षाच्या विधीमंडळ गटनेते पदी निवड झाली आहे. केंद्रीय निरीक्षक अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि विजय रुपाणी यांच्या उपस्थिती विधी मंडळात झालेल्या बैठकीत विधीमंडळ नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची गटनेता म्हणून निवड झाली आहे. मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना अखेर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाणार आहे. महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणारे देवेंद्र फडणवीस यांची कोट्यवधीची संपत्ती आहे. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या माहीती नुसार देवेंद्र फडणवीस यांच्या संपत्ती नेमकी किती आहे. हे पाहूयात…
१३ कोटीची नेटवर्थ, ६२ लाखाची उधारी
महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ होणारे देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या संपत्तीची माहिती घेऊ या. देवेंद्र यांची एकूण संपत्ती १३.२७ कोटी आहे. तर त्यांच्यावर ६२ लाखाचे कर्ज देखील आहे. माय नेता डॉट कॉम वर दिलेल्या शपथपत्रातील माहीतीनुसार देवेंद्र यांचे साल २०२३-२४ चे एकूण उत्पन्न ७९.३ लाख रुपये होते. तर एक वर्षांपूर्वी त्यांचे उत्पन्न ९२.४८ लाख होते.
पत्नीची शेअरमध्ये गुंतवणूक
निवडणूक शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नीच्या बॅंक खात्यात पाच लाखांहून जास्त डिपॉझिट आहे. त्याशिवाय देवेंद्र यांनी शेअर बाजार, बॉण्ड या डिबेंचर्समध्ये कोणती गुंतवणूक केलेली नाही. परंतू त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र ५.६३ कोटी रुपयांचे बॉण्ड,शेअर आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आहे. या शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या NSS-Postal Saving खात्यात १७ लाख जमा आहेत. तसेच त्यांच्याकडे तीन लाख रुपयांची एलआयसीची पॉलिसी देखील आहे.
जंगम संपत्ती किती ?
जंगम संपत्तीची माहिती पाहात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ४५० ग्रॅम सोने आणि पत्नीकडे ९०० ग्रॅम सोने आहे. याची किंमत सुमारे ९८ लाख आहे. तसेच महाराष्ट्राच्या होऊ घातलेल्या मुख्यमंत्र्याचे नावे कोणतीही कार नाही. तसेच त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे देखील चार चाकी वाहन नाही.फडणवीस यांच्यावर कर्ज आहे. ते म्हणजे त्यांची पत्नीने घेतलेले ६२ लाखाचे लोन त्यांना फेडायचे आहे.
तीन कोटीच्या घरात राहातात सीएम
महाराष्ट्राचे पुन्हा सीए बनणारे देवेंद्र फडणवीस यांच्या अचल संपत्तीत अमृता फडणवीस यांच्यानावावर १.२७ कोटीची एग्रीकल्चर जमीन आहे. रेसिडेन्सियल प्रॉपर्टी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीन कोटीचे घर आहे. आणि ४७ लाखाचे दुसरे एक घर आहे.तसेच त्यांच्या पत्नीच्या नावे देखील ३६ लाखाचे रेसिडेंशियल प्रॉपर्टी आहे.