सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरांचा वावर ? प्रशासनाचं म्हणणं काय ?

तिरुपती बालाजी मंदिरात मिळणाऱ्या प्रसादावरून वाद सुरू असतानाच आता मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादही भलताच चर्चेत आला आहे.

सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरांचा वावर ? प्रशासनाचं म्हणणं काय ?
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसाद चर्चेत आला आहे.
Follow us
| Updated on: Sep 24, 2024 | 1:23 PM

प्रसिद्ध तिरूपती बालाजी मंदिरातली प्रसादावरून संपूर्ण देशात रान पेटलंय. या प्रसादाच्या मुद्यावरून वाद सुरू असतानाचा आता मुंबईतील विख्यात सिद्धीविनायक मंदिरीातील प्रसादही खूप चर्चेत आला आहे. सिद्धीविनायक मंदिरातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिद्धिविनायक मंदिरात मिळणाऱ्या प्रसादाच्या टोपलीमध्ये उंदरांचा वावर असल्याचा दावा करणारा कथित व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. मात्र या कथित व्हिडीओची टीव्ही9 मराठी पृष्टी करत नाही. या मुद्यावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत.

प्रशासनाचं म्हणणं काय ?

मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरांचा वावर असल्याचा दावा करण्यात येत आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला, यानंतर मंदिर परिसरातील स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सिद्धिविनायक मंदिराच्या प्रशासनाने मात्र या वृत्तात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. हा व्हिडीओ फेक आहे, तो मंदिरबाहेरचाही असू शकतो. मंदिर परिसरात नेहमी स्वच्छता असते,  सिद्धिविनायक मंदिर विरोधात कोणीतरी कट रचत आहे, असा दावा सिद्धिविनायक न्यास मंदिराचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी केला. डीसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आम्ही चौकशी नेमणार आहोत असेही त्यांनी नमूद केलं.

तपासणी होणार

प्रसादाच्या टोपलीत उंदीर असल्याच्या व्हिडीओची तपासणी करण्यात येईल, चौकशी होईल, असं सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार  यांनी स्पष्ट केलं. मंदिर प्रशासनातर्फेही घडलेल्या प्रकाराची तपासणी होईल आणि योग्य ते स्पष्टीकरण देण्यात येईल, असंही मुनगंटीवार यांनी नमूद केलं. हा व्हायरल फोटो आणि व्हिडिओची यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे.

सिद्धिविनायक मंदिरात दररोज सुमारे 50 हजार लाडू बनवले जातात. प्रसादाच्या एका पाकिटात प्रत्येकी 50 ग्रॅमचे दोन लाडू असतात.

सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरं? व्हिडीओ होतेय व्हायरल
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरं? व्हिडीओ होतेय व्हायरल.
राऊत मूर्ख-बेताल, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरील टीकेवर शिरसाट भडकले
राऊत मूर्ख-बेताल, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरील टीकेवर शिरसाट भडकले.
आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर..; संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार
आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर..; संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार.
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'.
एक 'नाथ', एक न्याय...,अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर नरेश म्हस्केचं ट्वीट
एक 'नाथ', एक न्याय...,अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर नरेश म्हस्केचं ट्वीट.
Maharashtra Rain: पुढील चार दिवस वादळी पाऊस, कोणत्या भागात मुसळधार?
Maharashtra Rain: पुढील चार दिवस वादळी पाऊस, कोणत्या भागात मुसळधार?.
लोकलमध्ये कर्कश्श जाहिरातींचा तुम्हालाही त्रास? प्रवाशांची मागणी काय?
लोकलमध्ये कर्कश्श जाहिरातींचा तुम्हालाही त्रास? प्रवाशांची मागणी काय?.
बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर कसा? पोलिसांनी सांगितलं...
बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर कसा? पोलिसांनी सांगितलं....
हाके आक्रमक; मिस्टर संभाजी भोसले लाज वाटली पाहिजे, औकातीत बोला...
हाके आक्रमक; मिस्टर संभाजी भोसले लाज वाटली पाहिजे, औकातीत बोला....
'वय झालंय, बुड्ढा सठिया गया', खडसेंवर कोणाची जिव्हारी लागणारी टीका?
'वय झालंय, बुड्ढा सठिया गया', खडसेंवर कोणाची जिव्हारी लागणारी टीका?.