मुंबई : देशामध्ये परत एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचे बघायला मिळतंय. सतत कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसतंय. यामुळे आता परत एकदा कोरोनामुळे टेन्शन वाढल्याचे नक्कीच बघायला मिळत आहे. सतत देशातील रूग्णसंख्या ही वाढत आहे. राज्यात कोरोनाने पाय पसरवण्यास सुरूवात केलीये. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक रूग्ण हे सध्या मुंबईमध्ये आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा देखील सर्तक झाल्याचे बघायला मिळतंय. दुसरीकडे केरळमध्ये तर सतत रूग्णसंख्या वाढत आहे. तीन जणांचे निधन देखील कोरोनामुळे झाले. आता नागरिकांनी काळजी घेण्याची वेळ आलीये.
नुकताच आलेली राज्यातील कोरोनाची आकडेवारी ही धडकी भरवणारी नक्कीच दिसतंय. सध्या राज्यात ॲक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या 45 वर पोहचली आहे. हा आकडा सतत वाढताना देखील दिसतोय. एकाच दिवसात तब्बल 14 रूग्ण वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. आज नव्याने 14 कोरोनाबाधितांची नोंद झालीये.
राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 45 आहे. यामध्ये मुंबईमध्ये 27, ठाण्यामध्ये 8, रायगड 1, पुणे 8, कोल्हापूर 1 याप्रमाणे राज्यात रूग्ण आढळले आहेत. सतत कोरोनाच्या प्रकरणात वाढ होताना दिसत आहे. भारतामध्ये कोरोनाचे सक्रिय रूग्ण हे 2,311 आहे. कोरोनामुळे केरळमध्ये गेल्या 24 तासांमध्ये तीन जणांचे निधन झाले आहे. मोठ्या शहरांमध्येच कोरोना जास्त प्रमाणात पसरताना दिसतोय.
गोवा, केरळ आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. यामुळे संपूर्ण देशाचे टेन्शन वाढले आहे. मुंबईमध्ये सतत कोरोना रूग्णाची संख्या वाढत आहे. सर्वाधिक रूग्ण राज्यात मुंबईमध्ये आढळल्याचे बघायला मिळतंय. हा कोरोनाच्या नवा व्हायरस JN.1 आहे. यामध्ये लोक लवकर संक्रमित होताना देखील दिसत आहेत.
कोरोनाच्या या नव्या व्हायरसमुळे 16 लोकांचे एकून निधन झाले. भारतामध्ये काल 614 एकून कोरोना रूग्ण सापडले. WHO च्या म्हणण्यानुसार कोरोनाचा हा व्हायरस लवकर पसरत आहे, जे अत्यंत धोकादायक आहे. आता सततची कोरोना रूग्णांची वाढणारी प्रकरणे पाहता परत एकदा मास्क वापरण्याची वेळ येण्याची दाट शक्यता आहे.
तीन वर्षांपूर्वीच राज्यात कोरोना हाहाकार माजवला होता. लोकांचे जीवन पूर्णपणे बदलले. कोरोनामुळे घरातून बाहेर पडणे देखील शक्य नव्हते. शाळा बंद, आॅफिस बंद अशी स्थिती संपूर्ण देशात बघायला मिळाली. सर्वकाही परत सुरळीत झाल्यानंतर कोरोनाने परत एकदा डोके वर काढल्याने सर्वांचीच चिंता वाढल्याचे बघायला मिळत आहे.