Kirit Somaiya | गरज पडली तर महाराष्ट्रात केंद्राची टीम पाठवू, किरीट सोमय्यांना गृहसचिवांचं काय आश्वासन?
लोकप्रतिनिधींवरील हल्ल्याची आम्ही गंभीर दखल घेऊ.. अभ्यास करु.. गरज पडल्यास येथील टीमही महाराष्ट्रात पाठवू असं आश्वासन दिल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.
नवी दिल्लीः किरीट सोमय्यांसह राज्यातील इतर व्यक्तींवर झालेले हल्ले हे चिंताजनक असून महाराष्ट्रातील परिस्थितीचा अभ्यास करू. गरज पडली तर केंद्रीय गृहखात्याची (Home ministry) टीम महाराष्ट्रात पाठवू असं आश्वासन केंद्र सरकारचे गृहसचिव अजय भल्ला यांनी दिलं. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ही माहिती दिली. सोमय्या हे अन्य सातजणांच्या शिष्टमंडळासह आज नवी दिल्लीत गृहसचिवांच्या भेटीसाठी गेले होते. गृहसचिवांशी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेवर (Maharashtra police) जवळपास 30 ते 35 मिनिटं चर्चा झाली. आम्ही महाराष्ट्रातील सर्व स्थिती सविस्तर सांगितली . आमच्या सुरक्षेसाठी राज्यात स्पेशल टीम पाठवण्याची विनंतीही केल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. सोमय्यांसह आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, आमदार पराग शाह, आमदार राहुल नार्वेकर, विनोद मिश्रा यांचे शिष्टमंडळ आज नवी दिल्लीत होते.
काय म्हणाले किरीट सोमय्या?
गृहसचिव अजय भल्ला यांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘ गृहसचिव अजय भल्ला यांच्याशी आमचं डिटेल डिस्कशन झालं… 3-35 मिनिटं चर्चा झाली.. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसली… महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे.. सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत.. धमक्या येतायत.. जिवंत गाडण्याची भाषा केली जातेय..मुख्यमंत्री, त्यांचे प्रवक्ते करत आहेत. त्यांच्या अनेक तक्रारी इथे आल्या आहेत. सात उदाहरणं आम्ही दिली आहेत. या सगळ्याची उदाहरणंही आम्ही दिली आहेत.. हा विषय फक्त सोमय्याचा नाही… तर नेवीच्या अधिकाऱ्याचाही आहे.. झोपडपट्टी राहणाऱ्यांना धमकावण्याचा आहे.. शिवसेनेचे गुंड नेव्ही अधिकाऱ्याच्या घरी जाऊन त्याला मारतात. मनसुख हिरनची दोन पोलीस अधिकारी सुपारी घेऊन हत्या करतात, या थरापर्यंत कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
पोलिसांच्या कवचात हल्ला होतोच कसा?
स्वतः वरील हल्ल्याचा जाब विचारताना किरीट सोमय्या म्हणाले, ‘ आमदार खासदारांना जिवंत गाडण्याची धमकी दिली जाते.. किरीट सोमय्यांना केंद्रानं झेड सुरक्षा दिली आहे आणि त्यांच्यावर पोलिसांच्या आवारात त्यांच्या देखतच जीवघेणा हल्ला करतात. हे असं कसं घडू शकतं? त्यासाठी स्पेशल टीम पाठवा, अशी विनंती आम्ही केली. गृहसचिवांनीही आश्वस्त केलंय.. की आम्ही गंभीर दखल घेऊ.. अभ्यास करु.. गरज पडल्यास येथील टीमही महाराष्ट्रात पाठवू असं आश्वासन दिल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.
इतर बातम्या-