Pooja Khedkar : मोठा ट्विस्ट… पूजा खेडकर यांना मानसिक आजार?; अभिलेख अहवाल काय सांगतो?

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्यामागचा आरोपांचा सिसेमिरा काही सुटताना दिसत नाहीये. पूजा यांच्यावरील आरोप ताजे असतानाच त्यांच्या आईचा हातात पिस्तुल घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर त्यांच्या वडिलांवरही आरोप झाले. आता पूजा या मानसिक आजारी असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

Pooja Khedkar : मोठा ट्विस्ट... पूजा खेडकर यांना मानसिक आजार?; अभिलेख अहवाल काय सांगतो?
पूजा खेडकरImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 13, 2024 | 1:53 PM

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्र देऊन आयएएस अधिकारी झाल्याचा आरोप होत असतानाच आता पूजा खेडकर यांच्याबाबतच अजून एक प्रकरण समोर आलं आहे. पूजा खेडकर या मानसिक आजारी असल्याचं उघड झालं आहे. तसं अभिलेख अहवालात म्हटलं आहे. पूजा यांच्याकडे याबाबतचं प्रमाणपत्र असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे मानसिक आजारी व्यक्तीला एवढ्या मोठ्या पदावर घेतलं कसं? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे. आता या नव्या प्रकरणामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आली असून जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये पूजा यांना नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

वैद्यकीय मंडळाने दिले प्रमाणपत्र

पूजा यांना डोळे आणि मानसिक आजाराचे एकत्रित प्रमाणपत्र 2021 दिले होते. तत्कालीन वैद्यकीय मंडळांने हे प्रमाणपत्र दिले होते. शासकीय रुग्णालयाचे दस्तावेज तपासले असता त्यात या नोंदी आढळल्या असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

आईवर गुन्हा दाखल

दरन्यान, पूजा खेडकरची आई मनोरमा यांच्यावर पुणे जिल्ह्यातील पौड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळशीतील शेतकऱ्यांना हातात पिस्तूल घेऊन धमकविल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल वर्षभरानंतर गुन्हा दाखल झाल्याने पुणे ग्रामीण पोलिसांची कार्यप्रणाली संशयाच्या भोवर्‍यात अडकली आहे. 6 जून 2023 मध्ये पंढरी पासलकर यांनी मनोरमा यांनी आपल्याला पिस्तूल दाखवून धमकावल्याची तक्रार केली होती. प्रत्यक्षात पोलिस तपासात कोठेच पिस्तुलाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. अखेर पुणे ग्रामीण पोलीस पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी शेतकऱ्यांनी बाजू ऐकून गुन्हा दाखल करून घेतला आहे.

खेडकरांसाठी आत्मदहनाचा इशारा

दरम्यान, मुलगी आणि आईच नव्हे तर वडिलांवरही गंभीर आरोप आहेत. पूजा यांचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्यावरही गंभीर आरोप झालेले आहेत. दिलीप खेडकर हे सनदी अधिकारी असून अहमदनगर येथील पाथर्डी तालुक्यातल भालगाव हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या गावातील गावकरी त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. तसेच खेडकर कुटुंबावर होणारे आरोप खोटे असल्याचे गावकऱ्यांनी म्हटलंय. दिलीप खेडकर यांना काही झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.