गडकरीजी मानलं… 24 तासांत ‘एक्स्प्रेस वे’चा अवघड भाग बांधला; विश्वविक्रमाचे फडणवीसांकडून कौतुक

ही देशासाठी आणि मुंबईसाठी अभिमानाची बाब आहे. रस्ते निर्माण प्रकल्पातील या अभूतपूर्व कामगिरीसाठी नितीनजी तुम्हाला शुभेच्छा, असे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. | Nitin Gadkari

गडकरीजी मानलं... 24 तासांत 'एक्स्प्रेस वे'चा अवघड भाग बांधला; विश्वविक्रमाचे फडणवीसांकडून कौतुक
गडकरी यांच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिल्ली- वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र)
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 10:00 PM

नवी दिल्ली: मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री असा लौकिक असणाऱ्या नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. गडकरी यांच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिल्ली- वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे. (NHAI completes delhi vadodara mumbai expressway in record break time)

दिल्ली- वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्ग तयार करताना 24 तासांच्या कालावधीत झालेल्या कामामुळे चार विक्रम मोडीत निघाले आहेत. NHAI ने काँक्रिटच्या साहाय्याने एक्स्प्रेस वे बांधण्याचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. देशात वेगाने पायाभूत सुविधा उभारण्याचे काम करताना आम्ही केवळ नवे मापदंड निर्माण करुन थांबलो नाही तर जागतिक विक्रमही मोडीत काढला आहे, असे ट्विट नितीन गडकरी यांनी केले होते.

त्यांच्या या ट्विटला रिप्लाय देताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले. ही देशासाठी आणि मुंबईसाठी अभिमानाची बाब आहे. रस्ते निर्माण प्रकल्पातील या अभूतपूर्व कामगिरीसाठी नितीनजी तुम्हाला शुभेच्छा, असे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

नेमका काय विक्रम झाला?

दिल्ली- वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या बांधणीत काँक्रिटीकरण हा महत्त्वाचा टप्पा होता. रस्ता निर्माण करण्यासाठी 24 तासांमध्ये PQCचा (Pavement Quality Concrete) सर्वाधिक वापर केला गेला. 24 तासांत PQCचे सर्वाधिक उत्पादन केले गेले, PQC ने 24 तासांपर्यंत सलग 18.75मीटर रुंद रस्त्याची निर्मिती करण्यात आली. तसेच 24 तासांच्या कालावधीत एक्स्प्रेस वे वर PQC च्या वापराने जेवढा रस्ता तयार करण्यात आला, तो जागतिक विक्रम असल्याचा दावा नितीन गडकरी यांनी केला.

काही महिन्यांपूर्वीच गडकरींनी NHAI अधिकाऱ्यांना झापले होते

नितीन गडकरी यांनी ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) कामातील दिरंगाईबद्दल अधिकाऱ्यांना चांगलेच झापले होते. दिल्लीच्या द्वारकामध्ये प्राधिकरणाच्या कार्यालय इमारतीच्या उद्घाटनावेळी हा प्रसंग घडला होता. यावेळी त्यांनी इमारत उभारण्यात दिरंगाई झाल्याबद्दल अधिकाऱ्यांचा जाहीरपणे पाणउतारा केला. अकार्यक्षम कर्मचारी-अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होतो. याच अधिकाऱ्यांमुळे प्रकल्पांमध्ये अडचणी निर्माण होतात, असे खडे बोल त्यांनी सुनावले होते.

संबंधित बातम्या:

‘त्या’ महान अधिकाऱ्यांची छायाचित्रे इमारतीत लावा; नितीन गडकरी कामचुकार अधिकाऱ्यांवर संतापले

(NHAI completes delhi vadodara mumbai expressway in record break time)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.