अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर नीलम गोऱ्हेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, अक्षयचा मृत्यू…

Nilam Gorhe on Akshay Shinde Encounter : शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर भाष्य केलं आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांच्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी काय म्हटलं? वाचा सविस्तर......

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर नीलम गोऱ्हेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, अक्षयचा मृत्यू...
नीलम गोऱ्हेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 24, 2024 | 12:07 PM

बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा काल एन्काऊंटर झाला. यावरून सध्या वातावरण तापलं आहे. विरोधकांना या प्रकरणावरून सरकारला घेरलं आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. बदलापूरमध्ये चिमुरड्या मुलीवर अत्याचार झाले तशा घटना अनेक घडल्या. पोस्कोबाबत अनेक सुधारणा केल्या मात्र न्याय मिळायला वेळ लागतो. अक्षय शिंदे याचा मृत्यू कसा झाला त्याची चौकशी करण्यासाठी सरकार चौकशी करत आहे, असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरवेळी एक पोलीस अधिकारी देखील जखमी झाले आहेत. पोलिस अधिकाऱ्याने स्वतःला जखमी करण्याची घटना यापूर्वी घडलेली नाही. अक्षयच्या आईचं बोलणं दाखवत राहणं योग्य नाही. कुठलाही तपशील नाहीत. नसताना काही लोक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलिस यांच्यावर राजकारणासाठी टीका करत आहेत. चौकशीचा अहवाल आल्याशिवाय कुठल्याही निष्कर्ष पर्यंत जाऊ नये, असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

सत्य समोर येईलच- गोऱ्हे

भारतात आपण प्रचंड संयमाने केसेस चालवल्या आहेत. त्यामुळं असे आरोप करणे चुकीचं आहे. ही केस मागे न घेणारी केस आहे. बाकी आरोपींचा देखील खटला चालतो. तो आरोपी गेला म्हणून बाकी आरोपीला थोडीच पाठीशी घालणार आहेत? त्याचे सगळे मुद्दे चार्जशीटमध्ये आले आहेत. विरोधकांची भूमिका ही निवडणुकीत फायदा उचलणारी दिसत आहे. एन्काऊंटरची काही कुठली आचारसंहिता नाही. उज्वल निकम यांच्यासारखे मोठे वकील या प्रकरणात असल्याने सगळ सत्य समोर येणारच, असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारवर गंभीर आहेत. मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या केल्याचं राऊत म्हणालेत. यावरही नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी एन्काऊंटरच समर्थन अनेक वेळा केलं आहे. संजय राऊत यांची भूमिका दुटप्पी वाटते, असंही गोऱ्हे म्हणाल्यात.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.