फडणवीस पुरून उरतील, ते किती तरी ठाकरे-पवार खिशात घालून फिरतात; निलेश राणेंचा हल्लाबोल

निलेश म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे त्यांना अशा केसेस टाकून घाबरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, फडणवीस पुरून उरतील. ते किती तरी ठाकरे आणि पवार खिशात घेऊन फिरतात.

फडणवीस पुरून उरतील, ते किती तरी ठाकरे-पवार खिशात घालून फिरतात; निलेश राणेंचा हल्लाबोल
निलेश राणे
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 12:38 PM

रत्नागिरीः भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) पुन्हा एकदा आक्रमक झालेत. देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) हे किती तरी ठाकरे आणि पवार खिशात घालून फिरतात. शिवसेना नेते संजय राऊतच एक दिवस शिवसेना संपवतील आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून खासदार होतील, अशा टीकेच्या फैरी त्यांनी रविवारी झाडल्या. निलेश म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे त्यांना अशा केसेस टाकून घाबरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, फडणवीस पुरून उरतील. ते किती तरी ठाकरे आणि पवार खिशात घेऊन फिरतात. अजित पवार हे अर्थ खात्यासाठी योग्य नाहीत. त्यांना अर्थ खाते किती कळते ते माहीत नाही, पण अलोकेशन ऑफ फंड म्हणजे बजेट नव्हे. मी स्वतः फायनान्सचा विद्यार्थी आहे. मला बजेट माहित आहे. अलोकेशन ऑफ फंड म्हणजे इम्प्लिमेट ऑफ फंड नाही. मराठी भवनसाठी प्रत्येक वेळी निधी जाहीर होतो, पण आजवर एकही वीट रचलेली नाही. कोकणातील गडकिल्ल्यांना फक्त निधी जाहीर करतात. प्रत्यक्षात किल्ले ढेपाळत आहेत. वित्तीय तूट कशी झाली, यावर अजित पवार बोलतील का, त्यांना फक्त कारखाने कसे लुटायचे ते माहीत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

पवार दाऊदचा माणूस

निलेश म्हणाले की, राणेंचा आवाज बंद करायची शिवसेनेची औकात नाही. शरद पवार दाऊदचा पहिला माणूस असल्याचा मला संशय आहे. महाराष्ट्रात संशय देखील घेऊ शकत नाही का, अटक होण्याआधी अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला. मग नवाब मलिक जेलमध्ये आहेत, त्यांचा राजीनामा का नाही. मलिक पवारांचे कोण लागतात, असा सवाल त्यांनी केला. कितीही गुन्हे दाखल करा. मात्र, मी गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

राऊत शिवसेना संपवतील

निलेश राणे म्हणाले की, संजय राऊत यांना किती सीरियस घ्यायचे हे आता पत्रकारांनी ठरवायला हवे. त्यांनी आजवर किती विषय तडीस नेले हे सांगावे. राऊत हा शंभर टक्के पवारांचा माणूस आहे. ते पगार सामनाचा घेतात आणि इमानी पवार साहेबांची करतात. संजय राऊत शिवसेना संपवून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार होतील, असा आरोपही यावेळी त्यांनी केला. महाविकास आघाडीच्या कारभारावरही चौफेर टीका केली. आता याला शिवसेना आणि महाविकास आघाडीतून कोण आणि काय उत्तर देणार, हे पाहावे लागेल.

इतर बातम्याः

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.