Nitesh Rane : देवेंद्र फडणवीसांना हिंदुहृदयसम्राट म्हणण्यात चुकीचं काय? हिंदू जनआक्रोश मोर्चात नितेश राणेंचे उद्गार, शिवसेनेवर टीका
आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. हिंदू, लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि आदिवासी तरूणाच्या अपहरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला.
श्रीरामपूर, अहमदनगर : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हिंदुहृदयसम्राट म्हणण्यात चुकीचे काय, असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी श्रीरामपूर येथील मोर्चात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिंदुह्दयसम्राट असा उल्लेख केला. यावर वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर यावर स्पष्टीकरण देताना देवेंद्र फडणवीसांना हिंदुहृदयसम्राट म्हणण्यात चुकीचे काय, असा सवाल करत जो जो हिंदूचे रक्षण करतो, हिंदूच्या हृदयात आहे त्यांना हिंदुहृदयसम्राट नाही म्हणायचे तर काय म्हणायचे, असा प्रतिप्रश्न राणे यांनी उपस्थित केला आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb thackeray) हिंदुहृदयसम्राट आहेतच आणि कायम राहणार, असेही राणे यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. महाराष्ट्रात आता हिंदू सण मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस हिंदुहृदयसम्राट आहेत, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे.
हिंदू जनआक्रोश मोर्चा
आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. हिंदू, लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि आदिवासी तरूणाच्या अपहरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली. तर देवेंद्र फडणवीसांच्या उल्लेखावरून ते म्हणाले, की नवाब मलिक 93च्या बॉम्बस्फोटातील लोकांसोबत व्यवहार करतायत. दुसरीकडे, हिंदुंचे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जात आहेत. मग त्यांना हिंदुहृदयसम्राट म्हणायला हरकत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
काय म्हणाले नितेश राणे?
‘जसे उद्धव ठाकरे तशाच किशोरी पेडणेकर’
याकूब मेमनच्या भावाशी किशोरी पेडणेकरांच्या भेटीवर निलेश राणे यांची उद्धव ठाकरे आणि पेडणेकरांवर टीका केली आहे. किशोरी पेडणेकरांची भेट म्हणजे आश्चर्य नाही. दशहतवाद्यांबरोबर संबध असणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसत होते. जसे उद्धव ठाकरे तशाच किशोरी पेडणेकर. शिवसेना राहिली कुठे? शिवसेना आमच्यासोबतच आहे. अडीच वर्षाच्या कारकीर्दीत हिदू सणांवर निर्बंध टाकले. त्यांनी हिंदुत्वाची भाषा करू नये, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.