Nitesh Rane: नितेश राणेंची मध्यरात्रीपासून तब्येत बिघडली, उलट्यांचा त्रास सुरू

भाजपचे नेते, आमदार नितेश राणे (nitesh rane) यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना मध्यरात्रीपासून उलट्यांचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत.

Nitesh Rane: नितेश राणेंची मध्यरात्रीपासून तब्येत बिघडली, उलट्यांचा त्रास सुरू
नितेश राणे
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 11:53 AM

कोल्हापूर: भाजपचे नेते, आमदार नितेश राणे (nitesh rane) यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना मध्यरात्रीपासून उलट्यांचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत. नितेश राणे यांनी यापूर्वी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. तसेच त्यांचा रक्तदाबही वाढला होता. मात्र, सिंधुदुर्गातील (sindhudurga) ओरोस येथील रुग्णालयात हृदयरोग तज्ज्ञ नसल्याने त्यांना तातडीने ओरोस येथून कोल्हापुरातील (kolhapur) रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांना मध्यरात्रीपासून उलट्यांचा त्रास सुरू झाला. रात्रभरात त्यांनी तीन वेळी उलट्या केल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहेत. नितेश यांना उलट्यांचा त्रास नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालं नाही. अशक्तपणामुळेही त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नितेश राणे यांना सोमवारी ओरोसवरून कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले होते. या रुग्णालयातील हृदयरोग विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचं एक पथक नेमण्यात आलं आहे. काल त्यांच्या काही टेस्ट करण्यात येणार होत्या. परंतु, त्या झाल्या नाहीत. आज या वैद्यकीय टेस्ट होणार होत्या. मात्र, त्यांनी रात्रभरात तीन वेळा उलट्या केल्याने त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांच्या आज होणाऱ्या इतर वैद्यकीय चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वैद्यकीय पथक त्यांना तपासून उपचाराबाबतचा पुढील निर्णय घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. नितेश यांना रक्तदाब, छातीत दुखणे आणि मानदुखीचाही त्रास होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

नितेश राणेंना चालताही येईना

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून पोलिसांच्या ताब्यात असलेले नितेश राणे प्रचंड अशक्त झाले आहेत. ओरोस रुग्णालयातून आज नितेश कोल्हापूरला जाण्यासाठी बाहेर पडले. यावेळी ते अशक्त झाल्याचं दिसून येत होतं. तसेच त्यांना चालताही येत नसल्याचं दिसून येत होतं.

संबंधित बातम्या: 

Nitesh Rane: नितेश राणेंच्या छातीतील दुखणे वाढले, कोल्हापूरला जाताना अचानक रुग्णवाहिका थांबवली

नितेश राणे प्रकृती बिघडली? रुग्णालयात ठेवलं जाण्याची शक्यता; तर प्रकृती अस्वास्थ्यावरुन वैभव नाईकांचा जोरदार टोला

वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची छोटी मुलं चालवतायत रेस्टॉरंट; Video पाहून Anand Mahindraही भावुक, म्हणाले…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.