‘ना फ्लॉवर है, ना फायर है, फक्त बटरफ्लाय है’, पुष्पातील डायलॉगच्या आधारे नितेश राणेंचा उदय सामंतांवर निशाणा

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही ठाकरे सरकारवर (Mahavikas Aghadi) निशाणा साधला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला निधी मिळाला मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याला काहीच मिळाले नाही म्हणत त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांनाही टार्गेट केलं आहे.

'ना फ्लॉवर है, ना फायर है, फक्त बटरफ्लाय है', पुष्पातील डायलॉगच्या आधारे नितेश राणेंचा उदय सामंतांवर निशाणा
नितेश राणेंचा पालकमंत्र्यांवर हल्लाबोलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 7:13 PM

सिंधुदुर्ग : शुक्रवारी राज्याच्या अर्थसंकल्प (Budget 2022) सादर झाला आहे. या अर्थसंकल्पावर विरोधक कडाकडून टीका करत आहेत. आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही ठाकरे सरकारवर (Mahavikas Aghadi) निशाणा साधला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला निधी मिळाला मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याला काहीच मिळाले नाही म्हणत त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांनाही टार्गेट केलं आहे. सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्याला फक्त 14 कोटींचा भरीव निधी दिला गेला. याचा मी निषेध करतो. पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत, कॅबिनेटला उपस्थित राहत नाहीत. रत्नागिरी विमानतळाला 100 कोटी रुपये दिले सिंधुदुर्गला काहीच नाही. पालकमंत्री म्हणजे पुष्पा सिनेमातल्या डायलॉग सारखे आहेत.ना फ्लॉवर है,ना फायर है…फक्त बटरफ्लाय आहे. असे म्हणते नितेश राणेंनी उदय सामंत यांना टार्गेट केले आहे. नेमक आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला या सत्ताधारी महाविकास आघाडीने अर्थसंकल्पात काय दिलं? जिल्ह्याला अधोगती घेऊन जायचं हा एककलमी कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारचा आणि शिवसेनेच्या नेत्यांचा आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

मंत्र्यांना अर्थसंकल्प कळाला का?

सिंधुरत्न मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली योजना ,या योजनेसाठी अर्थसंकल्पात एक रुपयाची तरतूद नाही.मग योजना का केली ? असा सवाल त्यांनी केला आहे. महाविकास आघाडीचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात कोकणाला काय मिळालं अस विचारावस वाटत. कोकणातल्या सत्ताधारी लोकांना अर्थसंकल्प खरंच कळला का? असा मला प्रश्न विचारावासा वाटतो. काही घोषणा परत परत केल्या आहेत. पहिल्या अर्थसंकल्पावेळीही मुख्यमंत्री यांनी भाषण केलं होत तेव्हा ते म्हणाले होते नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये दिले जातील, अशी आठवण करुन देत त्यांनी हल्लाबोल चढवला आहे.

फडणवीस तुमचा बाप आहे-राणे

सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या भाजपच्या प्रत्येक नेत्या बरोबर अस केलं जातं,अडकवल जात. पण मी महाविकास आघाडीला सांगतो की देवेंद्र फडणवीस तुमचा बाप आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी फडणविसांना पोलिसांनी चौकशीसाठी नटोस बजावली आहे त्यावर दिली आहे. सध्या हे प्रकरण राजकारणातली धग वाढवत आहे. गोवा आणि उत्तरप्रदेशात म्याव म्यावचा आवाज नाही आला. म्हणून बघून आपले पाय पसरायचे असतात. मोदींचा फोटो लावला नाहीतर काय अवस्था होते ते बघा, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. कारण पाच राज्याच्या निवडणूक निकालात शिवसेनेच्या हाती काहीच लागले नाही.

‘आरोप सिद्ध झाल्याशिवाय नवाब मलिकांचा राजीनामा नाही’, जयंत पाटील यांचा पुनरुच्चार, भाजपवर निशाणा

TOP 9 Headlines | 12 मार्च 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

‘परमेश्वराने मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो’, खासदार सुजय विखे-पाटलांची काँग्रेसवर टोलेबाजी

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.