Nitesh Rane : नितेश राणेंची अँजिओग्राफी टेस्ट करणार, राणेंना नेमकं झालंय काय?
भाजप आमदार नितेश राणेंना जामीन मिळाल्याची दिलासादायक बातमी भाजप कार्यकर्ते आणि राणे कुटुंबियांसाठी आली आहे. मात्र नितेश राणेंबाबत आणखी एक चिंताजनक बाबत समोर आली आहे. नितेश राणेंची आज अँजिओग्राफी टेस्ट करण्यात येणार आहे.
कोल्हापूर : भाजप आमदार नितेश राणेंना जामीन (Nitesh Rane Got bail) मिळाल्याची दिलासादायक बातमी भाजप कार्यकर्ते आणि राणे कुटुंबियांसाठी आली आहे. मात्र नितेश राणेंबाबत आणखी एक चिंताजनक (Nitesh Rane health) बाबत समोर आली आहे. नितेश राणेंची आज अँजिओग्राफी टेस्ट (angiography) करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवासांपासून नितेश राणेंची तब्येत अस्थिर आहे. त्यांच्यावर छातीत दुखत असल्याने कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. मध्यरात्री उलट्याही झाल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी 6 वाजता टेस्ट केली जाणार आहे. नितेश राणेंच्या या टेस्टबाबत अधिकृतरित्या माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. छातीत दुखत असल्याने नितेश राणे यांना सिंधुदुर्गमधून कोल्हापुरात नेण्यात आलं होतं. सिंधुदुर्ग आरोग्य विभागाने केलेल्या सूचनेप्रमाणे सिटी अँजिओग्रफी टेस्ट केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
टेस्ट कशी पार पडणार?
चार डॉक्टरांच्या उपस्थित नितेश राणे यांची ही टेस्ट पार पडणार आहे. मात्र जामीन मिळाल्यामुळे नितेश राणे सिटी अँजिओग्रफी करून घ्यायला तयार होणार की नाही? याकडं लक्ष लागलंय. सीटी अँजिओग्रफी करण्यासाठी नितेश राणे यांना चार तासापासून कोणतही अन्न देण्यात आलेल नाही, अशी माहितीही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती सतत खालावत असल्याने राणेंना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरूवातील राणेंवर सिंधुदुर्गमध्ये उपचार करण्यात आले, मात्र तब्येत अधिक बिघडल्याने त्यांना कोल्हापूरला नेण्यात आले.
आजच राणेंंना जामीन मंजूर
नितेश राणे यांना संतोष परब यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं आणि शेवटी ते सेशन्स कोर्टापर्यंत आलं. अनेक राजकीय तसच कोर्टातल्या घडामोडीनंतर नितेश राणेंना जामीन मंजूर केला गेलाय. नितेश राणे यांना जामीन मंजूर करताना कोर्टाने काही अटीशर्ती घातल्या आहेत. नितेश राणे यांना चार्जशीट दाखल होईपर्यंत कणकवलीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. तर तपासात कुठलाही हस्तक्षेप करू नये असे आदेशही कोर्टाने त्यांना दिले आहे. तसेच साक्षीदारांवर कोणताही दबाव आणू नये असेही कोर्टाने ठणकावले आहे. मात्र आता राणेंच्या टेस्टे भाजप आणि राणे कुटुंबियांची चिंता वाढवली आहे. अशात नितेश राणे काय निर्णय घेतात याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.