मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) उमेदवाराचा पराभव झाला तर भाजपच्या पाच आमदारांचा विजय झाला. यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील तर प्रामुख्याने शिवसेनेतील खदखद बाहेर पडली. तसेच ही खदखद घेऊ एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी आपल्या समर्थक शिवसेनेचे आमदारांसह सुरत गाठली. त्यात आमदारांत नितीन देशमुख ही असल्याचे समोर आले आहे. याचदरम्यान एक चिंतेची बातमी आली असून नितीन देशमुखांच्या (MLA Nitin Deshmukh) छातीत दुखत असल्याची तक्रार आहे. त्यानंतर गंभीर अवस्थेत आमदार देशमुख यांनी सुरत येथील सिव्हिल रुग्णालयात (Civil Hospital) दाखल करण्यात आले. मात्र याच्याआधी ते आपल्या घरी जाणार असल्याचे म्हटले जात होते. तर त्यादरम्यान त्यांनी आपल्या घरी फोन करून मी अकोल्यातील घरी परत येणार असल्याचे म्हटले होते. मात्र एकीकडे एकनाथ शिंदे यांच्यामुळे निर्माण झालेली सध्याची स्थिती आणि देशमुखांची बिघडलेली प्रकृतीमुळे राज्यात वातावरण तणावाचं बनलं आहे.
शिवसेनेचे नितीन देशमुख हे बाळापूर मतदारसंघातील आमदार असून ते कालपासून नॉट रिचेबल होते. तर ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरत येथे गेले आहे. याचदरम्यान त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना सुरत येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर देशमुख यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. आमदार देशमुख यांना रुग्णालयात दाखल करताच या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांच्या प्रकृतीची वेळोवेळी माहिती घेण्यात येत आहे. तर त्यांना चांगल वाटतं असेल तर शिंदे पुन्हा हॉटेलमध्ये घेऊन जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनेचे नितीन देशमुख यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही दबाव वाढू नये त्यांना योग्य उपचार आपल्या समोर व्हावे यासाठी एकनाथ शिंदे देशमुखांना पुन्हा हॉटेलमध्ये घेऊन जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
बाळापूर मतदारसंघातील आमदार नितीन देशमुख हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरत येथे गेले असताना त्यांची तब्बेत बिघडली. ज्यामुळे त्यांनी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यादरम्यान त्यांच्या प्रांजल देशमुख यांनी अकोला शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तर माझे पती बेपत्ता आहेत. त्यांना लवकर शोधावे, असे म्हटले आहे.