‘मला जीवे मारुन टाकण्याचा प्रयत्न झाला’; आमदार नितीन देशमुख यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. "शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता", असा खळबळजनक गौप्यस्फोट नितीन देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांवर आता शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

'मला जीवे मारुन टाकण्याचा प्रयत्न झाला'; आमदार नितीन देशमुख यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
आमदार नितीन देशमुख
Follow us
| Updated on: Oct 04, 2024 | 9:58 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारला तेव्हा नितीन देशमुख हे सुद्धा इतर आमदारांसोबत सुरता गेले होते. पण नितीन देशमुख रातोरात परत आले होते. त्यावेळी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता, असा धक्कादायक दावा नितीन देशमुख यांनी केला आहे. मला त्यावेळी जीवे मारुन टाकण्याचा प्रयत्न होता, असा खळबळजनक दावा नितीन देशमुख यांनी केला. ते अकोल्यात कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांच्यासमोर मंचावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील होते.

“शिंदे गटाने माझी चौकशी लावली खरी, पण आता माझ्या मुलासह आठव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचीही ACB चौकशी लावली. पण आपण कधीही डगमगलो नाही. मी सुरतला गेलो होतो, तेव्हा माझ्यासोबत घात करण्याचा प्रयत्न झाला. मला इंजेक्शन देण्यात आले होते. तेव्हा बातमी पसरली की आमदार देशमुखांना हृदय विकाराचा झटका आला. मला कोणताही झटका आला नव्हता. त्यांना माझा घातपात करायचा होता का?”, असं नितीन देशमुख म्हणाले.

नितीन देशमुख यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

“मला भाजपच्या एका आमदाराने सांगितलं. दिल्लीवरून एक फोन आला होता, कोणत्याही परिस्थितीत नितीन देशमुख परत जाता कामा नये, मारून टाकायचं काम पडलं तरी गेम करून टाका. तेव्हा टीव्हीवर बातमी पसरवली हृदय विकाराचा झटका आला आणि दिल्लीवरून फोन येतोय, ऐकत नसेल तर मारून टाका. हे सर्व मला भाजपच्या आमदाराने सांगितलं”, असा खळबळजनक गौप्यस्फोट नितीन देशमुख यांनी केला. दरम्यान, “मला पराभूत करण्यासाठी आज कटकारस्थान रचले जात आहे”, असं देखील नितीन देशमुख म्हणाले.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.