Nitin Gadkari Exclusive | देशातील लॉकडाऊन वाढणार का? नितीन गडकरी म्हणतात…

3 मेनंतरही लॉकडाऊन वाढणार की नाही याविषयी चर्चा सुरु आहे. याविषयी अनेक अंदाज लावले जात आहेत. याविषयी स्वतः भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील भाष्य केलं आहे (Nitin Gadkari on Lockdown extension).

Nitin Gadkari Exclusive | देशातील लॉकडाऊन वाढणार का? नितीन गडकरी म्हणतात...
Follow us
| Updated on: Apr 24, 2020 | 7:47 PM

मुंबई : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरातील लॉकडाऊनचा कालवधी 14 एप्रिलनंतर 3 मेपर्यंत वाढवण्यात आला. मात्र, आता पुन्हा एकदा 3 मेनंतरही लॉकडाऊन वाढणार की नाही याविषयी चर्चा सुरु आहे. याविषयी अनेक अंदाज लावले जात आहेत. याविषयी स्वतः भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील भाष्य केलं आहे (Nitin Gadkari on Lockdown extension). ज्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत आहेत, ते ठिकाण सील करुन तेथे रुग्णांची संख्या कमी होईपर्यंत काळजी घेतली पाहिजे. मात्र, सरसकट सर्व जिल्ह्यांना शहरांना एकच नियम लावून बंद करणं चांगलं होणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. ते ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले, “मला वाटतं ज्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोगी निघाले आहेत ते ठिकाण सील करुन तेथे रुग्णांची संख्या कमी होईपर्यंत काळजी घेतली पाहिजे. सरसकट सर्व जिल्ह्यांना शहरांना एकच नियम लावून बंद करणं चांगलं होणार नाही. जेथे कोरोनाचे रुग्ण नाहीत तेथे कसं वागायचं कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची यावर लक्ष दिलं पाहिजे. सुरुवातीला लोकांमध्ये खूप निष्काळजीपणा होता, पण आता लोक काळजी घेताना दिसत आहेत. लोक जागरुक झाले आहेत. लोक नक्की नियम पाळतील.”

अर्थव्यवस्थेलाही गतीमान करावं लागणार आहे. आम्ही राष्ट्रीय महामार्ग, पोर्ट, निर्यात, आयातीचा माल स्विकारणं सुरु केलं आहे. आजच 55 ते 60 टक्के वाहतूक रस्त्यावर आली आहे. असं असलं तरी काम नसताना फिरायला बाहेर पडणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी. ज्यांना तातडीने काही गोष्टी करायच्या असतील त्यांची गोष्ट वेगळी आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

“भारताला लॉकडाऊनचा 101 टक्के फायदा”

नितीन गडकरी म्हणाले, “लॉकडाऊनचा भारताला 101 टक्के फायदा झाला आहे. यासाठी अमेरिकेशी तुलना करुन पाहा. अमेरिका, इटकी, फ्रान्स, जर्मनी, युके, जपानमध्ये किती रुग्ण मिळाले. हे सर्व प्रगतीशील देश आहेत. त्या देशांमधील वैद्यकीय सुविधा आपल्या तुलनेत दोन ते तीन पट अधिक चांगल्या आहेत. त्या तुलनेत त्यांची अवस्था कशी झाली आहे? त्या पार्श्वभूमीवर भारतात सर्वांनी मिळून यश मिळवलं आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अगदी योग्य वेळी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग थांबला आहे. एकिकडे लॉकडाऊनही पाळायचा आहे आणि दुसरीकडे आपलं जीवनही सुरळीत करायचं आहे, सुस्थिती आणायचं आहे आणि आर्थिक चक्र सुरु करायचं आहे. या दोन्ही गोष्टी करताना काय करायचं आहे आणि काय नाही याचा विचार करावा. हे केलं तर नक्की अडचण येणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या :

Nitin Gadkari Exclusive | मुख्यमंत्र्यांनी सांगावं, मी नागपुरात बसल्या बसल्या लाख-दीड लाख PPE किट पाठवतो : गडकरी

बुलेट ट्रेन रोखा, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखणं अमानवीय : राहुल गांधी

वाशिम जिल्हा कोरोनामुक्त, एकमेव कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह

Marathwada Corona Update | लढवय्या मराठवाडा कोरोनाचा मुकाबला कसा करतोय?

Pune Corona | 74 हॉस्टेल्स, 300 शाळा सज्ज, पुण्यात कोरोना लढ्यासाठी प्रशासनाची काय काय तयारी?

संबंधित व्हिडीओ:

Nitin Gadkari on Lockdown extension

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.