Nivruttinath | 800 वर्षांपूर्वी संजीवन समाधी, यशापासून निवृत्ती, ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू; संत निवृत्तीनाथांची यात्रोत्सवानिमित्त अनोखी ओळख!

ज्ञानोबा माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. त्यांचे प्रेरणास्थान होते, त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि गुरू संत निवृत्तीनाथ. आज त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथांचा यात्रोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याची ओळख...

Nivruttinath | 800 वर्षांपूर्वी संजीवन समाधी, यशापासून निवृत्ती, ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू; संत निवृत्तीनाथांची यात्रोत्सवानिमित्त अनोखी ओळख!
संत निवृत्तीनाथ.
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 7:05 AM

नाशिकः संत ज्ञानेश्वर (Dnyaneshwar) माऊलींचे नाव जगदविख्यात आहे. त्यांनी किशोरवयात प्रस्थापितांशी केलेला विद्रोह आजही अनेकांना त्यांच्या महान कार्याची आठवण करून देतो. ज्ञानोबा माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. त्यांचे प्रेरणास्थान होते, त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि गुरू संत निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथांनी (Nivruttinath) नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) 800 वर्षांपूर्वी संजीवन समाधी घेतली. त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून दरवर्षी पौष वद्य एकादशीला त्र्यंबकेश्वरमध्ये श्री संत निवृत्तीनाथ यात्रा भरते. यावर्षी 25 ते 29 जानेवारी दरम्यान रोजी पौष वारी आहे. या यात्रेसाठी संपूर्ण राज्यातून किमान 5 लाख वारकरी, भाविक त्र्यंबकेश्वर येथे येतात. जवळपास 500 ते 600 पायी दिंड्या असतात. शेकडो वर्षांची ही परंपरा आहे. मात्र, यंदाही कोरोनामुळे ही पौष वारी रद्द करण्यात आली आहे. प्रशासनाने नवीन नियमावली जारी केली आहे. त्यानुसार त्र्यंबकेश्वरकडे जाण्यास पायी दिंड्यांना जाण्यास परवानगी नाकारली आहे. त्र्यंबकेश्वर शहरात व परिसरात यात्रा भरवता येणार नाही. मंदिरात पूजाविधीसाठी 50 पुजारी, सेवेकऱ्यांना उपस्थितीस परवानगी असेल. रथोत्सवात केवळ 50 व्यक्तींचीच उपस्थिती असेल. त्यांचेही लसीकरण होणे बंधनकारक आहे. कार्यक्रमादरम्यान वाद्य वाजवण्यास मनाई आहेच, सोबत मंदिरात 50 हून व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई केलीय, या नियमांच्या जंजाळात आज निवृत्तीनाथांचा यात्रोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याची ओळख…

गहिनीनाथ गुरू…

संतकृपा झाली ! इमारत फळा आली !! १ !! ज्ञानदेवे रचिला पाया ! उभारिले देवालया !! २ !! नामा तयाचा किंकर ! तेणे केला हा विस्तार !! ३ !! जनार्दन एकनाथ ! खांब दिला भागवत !! ४ !! तुका झालासे कळस ! भजन करा सावकाश !! ५ !!

असे वारकरी संप्रदायाबद्दल लिहिले आहे. ज्ञानेश्वरांना हा पाया घालण्याचे बळ आणि मार्गदर्शन केले ते संत निवृत्तीनाथांनी. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली. त्यांचे जन्मवर्ष 1273 ​किंवा 1268 सां​गितले जाते. ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, निवृत्तीनाथ ह्या भावंडांमधे निवृत्तीनाथ थोरले. त्यांनीच ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली. ग​हिनीनाथ हे ​निवृत्तीनाथांचे गुरू होते.

‘निवृत्तिचे ध्येय कृष्ण हा​चि होय ।

ग​यिनीनाथे सोय दाख​विली ॥’

असे निवृत्तीनाथांनीच आपल्या एका अभंगात म्हणून ठे​वले आहे. विशेष म्हणजे पुढील आयुष्यात ते हे वाक्य अक्षरशः जगले. गहिनीनाथांची दीक्षा घेतल्यानंतर उर्वरित सारे जीवनही त्यांनी फक्त कृष्णभक्तीत घातले. ऐहिक जीवन आणि संसारकडे पाठ वळवून फक्त हरिनामात आपला वेळ घालवला. आपल्याकडील दीक्षा आपले बंधू संत ज्ञानेश्वरांना दिली. त्यांचीही अध्यात्मिक बैठक पक्की केली.

निवृत्तीनाथांची रचना…

निवृत्तीनाथांनी विपुल लेखन केले. त्यांनी सुमारे तीन-चारशे अभंग आ​णि एक ह​रिपाठ लिहिला. त्यांचे अभंग योगपर, अद्वैतपर आ​णि कृष्णभ​क्तिपर आहेत. निवृ​त्तीनाथांची ओळख ही विशेषतः ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक ‌म्हणून जास्त आहे. त्यांनी आपले संपूर्ण अध्यात्मज्ञान ज्ञानेश्वरांना दिले. त्यांच्या पदरी यश देत ते स्वतः या यशापासून निवृत्त झाले, असे त्यांच्याबद्दल म्हटले जाते. ज्ञानेश्वरांनी आदर अनेक ठिकाणी त्यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त केला आहे.

या ग्रंथांचेही लेखन…

संत निवृत्तीनाथांनी निवृत्तीदेवी, निवृ​त्तीसार आ​णि उत्तरगीताटीका असे तीन ग्रंथ लिहिले असे म्हणतात. मात्र, ते सध्या उपलब्ध नाहीत. निवृत्तेश्वरी असा एक ग्रंथ त्यांनी लिहिल्याचे रा. म. आठवले यांनी उल्लेख केला आहे. मात्र, तो ग्रंथ निवृत्तीनाथांचाच आहे, असे सिद्ध झालेले नाही. धुळ्याच्या श्रीसमर्थवाग्देवतामंदिरात ‘सटीक भगवद्‌गीता’ आणि ‘समाधि बोध’ अशी दोन हस्तलिखिते निवृत्तिनाथांची म्हणून ठेवलेली आढळतात.

नामदेवांच्या अभंगात उल्लेख

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करताना योगीराज गहिनीनाथांचा सहवास निवृत्तीनाथांना लाभला. तोच वारसा त्यांनी धाकट्या ज्ञानोबारायांना दिला. त्यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला. संत ज्ञानेश्वर आणि सोपानदेवांनी समाधी घेतली. त्यानंतर संत मुक्ताई यांनी अन्नपाणी त्यागून हे जग सोडले. त्यानंतर संत निवृत्तीनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठ वद्य 12 शके 1219 रोजी संजीवन समाधी घेतली. संत निवृत्तिनाथांनी ज्येष्ठ वद्य द्वादशीस त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतल्याचे वर्णन संत नामदेव महाराज यांच्या अभंगात आले. त्यानंतर ही बाब समोर आली.

इतर बातम्याः

Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!

Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना

National Children’s Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; ‘स्वयंम’च्या यशाने पंतप्रधानही भारावले…!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.