जीवे मारण्याची धमकी म्हणजे दुसरी स्टंटबाजी, एकनाथ शिंदे यांच्यावर माओवादी प्रवक्त्याची आगपाखड

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी म्हणजे दुसरी स्टंटबाजी आहे, असं भाकपाच्या (माओवादी) पश्चिम ब्युरो प्रवक्ता श्रीनिवास याने म्हटलं आहे.

जीवे मारण्याची धमकी म्हणजे दुसरी स्टंटबाजी, एकनाथ शिंदे यांच्यावर माओवादी प्रवक्त्याची आगपाखड
एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याला गती
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 11:55 PM

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे सांगणे  म्हणजे दुसरी स्टंटबाजी आहे, असं भाकपाच्या (माओवादी) पश्चिम ब्युरो प्रवक्ता श्रीनिवास याने म्हटलं आहे. तसं पत्रकच भाकपाने जारी केलंय. दरम्यान, शिंदे यांना धमकीचे पत्र नेमके कुठून आले याचा तपास अजून सुरूच असल्याचे समजते.

एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार यांच्यावर आगपाखड

जिल्ह्यातील लोहखाणींची लीज आणि खाणींविरोधातील आंदोलन या विषयाला धरून प्रवक्ता श्रीनिवास याने काढलेल्या पत्रकात सत्तापक्षातील मंत्री विजय वडेट्टीवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आगपाखड केली आहे. खाणींविरोधातील आंदोलनात सहभागी होण्यावरून वडेट्टीवार यांना, तर लोहप्रकल्प उभारण्यावर ठाम असण्यावरून शिंदे यांना त्याने लक्ष्य केले. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळातच लोहखाणीची लीज देण्यात आली. भाजप-शिवसेनेच्या सरकारने अन्य कंपन्यांना लीज वाटप केली. त्यामुळे वडेट्टीवार आणि त्यांचा काँग्रेस पक्ष सुरजागड खाण खोदण्याच्या बाजूने आहे हे स्पष्ट होते.तसेच सत्ता आणि कायदा यांच्या हातात असताना सुरजागड खाण बंद करण्याचा आदेश का देत नाही? असा सवाल प्रवक्ता श्रीनिवासने पत्रकातून केला आहे.

कायदा व सुव्यवस्थेचे कारण सांगून वडेट्टीवार यांनी आंदोलनाकडे पाठ फिरविली हा बहाणा होता, असा आरोपही श्रीनिवसाने केला. हे पत्रक सोशल मीडियावर फिरत असले तरी ते नक्षल्यांकडून जारी झाले किंवा नाही याबाबतची सत्यता कळू शकली नाही.

धमकीला झुगारुन एकनाथ शिंदेंची पोलीस ठाण्याला भेट

दरम्यान, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. नक्षवाद्यांकडून ही धमकी मिळाली असे सांगण्यात आले होते. शिंदे यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबियांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात ही धमकी आल्याची माहिची राज्याच्या गृहविभागाने दिली होती. धमकी दिल्याचे सजताच गृहविभागाने तत्काळ पावलं उचलत तपास सुरु केला होता. तर नक्षलवाद्यांच्या धमकीला भीक न घालता शिंदे यांनी शनिवारी 30 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील दोदराज पोलीस ठाण्याला भेट दिली होती. इतकंच नाही तर तिथल्या पोलीस जवानांच्या सोबत दिवाळीचा सणही शिंदे यांनी साजरा केला होता.

इतर बातम्या :

Jammu Kashmir: पुन्हा दहशतवादी हल्ला, एक नागरिक आणि पोलिस जखमी

मोठी बातमी! मोदी सरकारनं 6.5 कोटी खातेदारांना PF व्याजाची रक्कम पाठवली, तुमच्या खात्यात पैसे आले का?

एसटी कर्मचारी आंदोलनावरुन संजय राऊतांचा मुनगंटीवारांवर गंभीर आरोप, आता मुनगंटीवारांचंही प्रत्युत्तर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.