राष्ट्रवादीत गृहमंत्रीपद नको म्हणणारे जास्त, ममताही महाविकास आघाडीच्या प्रेमात : शरद पवार

“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गृहमंत्रीपद नको म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे. खातेवाटपावरुन कोणतीही नाराजी नाही. तसंच ममता बॅनर्जीही महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्यासाठी उत्सुक आहेत” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले

राष्ट्रवादीत गृहमंत्रीपद नको म्हणणारे जास्त, ममताही महाविकास आघाडीच्या प्रेमात : शरद पवार
Follow us
| Updated on: Jan 02, 2020 | 4:46 PM

अहमदनगर : “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गृहमंत्रीपद नको म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे. खातेवाटपावरुन कोणतीही नाराजी नाही. तसंच ममता बॅनर्जीही महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्यासाठी उत्सुक आहेत” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले (Sharad Pawar on home ministry ). ते नगरमध्ये बोलत होते.

“मंत्रिपद मिळाले नाही म्हणून कोणी नाराज नाही. आमच्याकडे चित्र वेगळेच आहे. मी विचारले की गृहमंत्री तुम्हाला हवे का, मात्र सर्वांनी नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादीत गृहमंत्रिपद नको म्हणणाऱ्यांचीच संख्या जास्त आहे” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. शरद पवार हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रामनाथ वाघ यांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.(Sharad Pawar on home ministry )

“खाते वाटपावरुन अजिबात दबाव नाही. खात्याचे सर्व निर्णय झाले आहेत. कोणाकडे काय द्यायचे याचा निर्णय झाला आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्री खातेवाटप जाहीर करतील” असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

ज्यांनी शपथ घेतली, त्यांच्या खात्याबाबत जो तो पक्ष ठरवेल. मात्र मंत्रिमंडळात तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी देण्याचे प्रयत्न आम्ही केला आहे. त्यांना जास्त काम आम्ही देणार आहोत. राज्यमंत्री कमी आहे, मात्र प्रत्येकाला जास्त खाते देणार असून, त्याचा निर्णय आज किंवा उद्या होईल असंही पवारांनी सांगितलं.

मंत्रिपद मिळाले नाही म्हणून कोणी नाराज नाही. आमच्याकडे चित्र वेगळे आहे. गृहमंत्रिपद नको म्हणणाऱ्यांचीच जास्त संख्या राष्ट्रवादीत आहे, असा दावा पवारांनी केला.

तसेच मी परवा झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया वाचली, त्यांनी असे म्हटले की महाराष्ट्रातून शरद पवारांनी जो निर्णय घेतला त्यातून आम्हाला प्रेरणा मिळली. जर असा निर्णय बाकी सर्वांनी करायचा ठरवलं तर लोकांना पर्याय मिळेल. आम्ही समान कार्यक्रम देण्याचा प्रयत्न केला, लोकांच्या मनात विश्वास आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

“त्याचबरोबर मला कालच ममता बॅनर्जींचं पत्र आलं आहे. त्या म्हणाल्या आम्ही देखील पुढाकार घेऊन एक बैठक बोलावली आहे. आम्ही अजून चर्चा करुन बाकीच्या लोकांशी बोलू” असं शरद पवारांनी सांगितलं.

बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...