Nagpur : न्यायपालिकेच्या निर्णयात कुणाचाही हस्तक्षेप नको, पण न्याय लवकर मिळावा; नितीन गडकरींचं विधान

| Updated on: Jul 10, 2022 | 12:37 PM

राजकारणामध्ये मतभेद असू शकतात पण मनभेद नाही. त्यामुळे लॉ युनिव्हरीसीटी सारखी वास्तू नागपूरात उभी राहिली आहे. यामध्ये राज्यातील दोन्ही सरकराचे योगदान राहिले आहे. राजकारणाच्या दरम्यान, आरोप-प्रत्यारोप होत असले तरी विकास कामावर याचा सूतभरही परिणाम होत नाही. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे.

Nagpur : न्यायपालिकेच्या निर्णयात कुणाचाही हस्तक्षेप नको, पण न्याय लवकर मिळावा; नितीन गडकरींचं विधान
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Image Credit source: twitter
Follow us on

नागपूर : सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी (Justice system) न्यायपालिकेच्या निर्णयावर प्रत्येकाचा विश्वास असणे गरजेचे आहे. असे झाले तरच लोकशाही अधिक मजबूत होणार आहे. त्यामुळे न्यायपालिकेच्या निर्णयात कुणाचाही (Interference) हस्तक्षेप नसायला पाहिजे. यामध्ये कुणाचा हस्तक्षेप राहिला नाही तरी न्याय देखील लवकरात लवकर मिळणे गरजेचे आहे. कारण वेळेत न्याय मिळाला नाही तर एखादी संस्था, कंपनी ही उध्वस्त होऊ शकते असे मत (Nitin Gadkari) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे नागपूरातील लॉ युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलच्या उद्घाटन प्रसंगीच्या कार्यक्रमात न्यायव्यवस्थेवरच त्यांनी मनोगत व्यक्त केले. शिवाय न्यायच नाही तर जीवनात कोणतीही गोष्ट वेळेत झाली तरच त्याचे महत्व असल्याचेही गडकरी यांनी सांगितले आहे.

विकासात राजकारण नाही, हीच महाराष्ट्राची संस्कृती

राजकारणामध्ये मतभेद असू शकतात पण मनभेद नाही. त्यामुळे लॉ युनिव्हरीसीटी सारखी वास्तू नागपूरात उभी राहिली आहे. यामध्ये राज्यातील दोन्ही सरकराचे योगदान राहिले आहे. राजकारणाच्या दरम्यान, आरोप-प्रत्यारोप होत असले तरी विकास कामावर याचा सूतभरही परिणाम होत नाही. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. राज्यातच ही स्थिती असे नाही तर नागपुरातील आम्ही राजकारणी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करतो मात्र विकासासाठी आम्ही एकत्र येत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

लॉ युनिव्हर्सिटीमुळे शैक्षणिक क्षेत्रात भर

लॉ युनिव्हर्सिटीमुळे नागपूरच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये भर तर पडली आहे पण आता हॉस्टेलच्या उद्घाटनाने विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणाही निर्माण होणार आहे. शिवाय जोपर्यंत दर्जेदार शिक्षण देता येणार नाही तोपर्यंत शहराचा विकास साधता येणार नाही. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही वास्तू उभी राहिल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. आम्ही दोघांनी ठरविल्याप्रमाणे नागपुरात आता शिक्षणाच्या बाबतीत वर्ल्ड क्लास सुविधा दिली जाणार आहे. त्याचीच सुरवात या लॉ युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

युनिव्हर्सिटीसाठी निधी कमी पडू देणार नाही

केवळ राज्यातच नाही तर देशात ही युनिव्हर्सिटी वेगळी ठरली पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली जाणार आहे. युनिव्हर्सिटीने दोन वर्षाचा रोड मॅप तयार करावा त्यासाठी राज्य सरकार कुठलाही विलंब लावणार नाही. विकासकामासाठी युनिव्हर्सिटीला कर्ज देखील घ्यावे लागणार नाही. ही वास्तू सामान्याप्रमाणे नाही तर देशाची गरिमा वाढविणारी केली जाणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेल उद्घाटन प्रसंगी नागपुरकर आणि विद्यापीठातील सर्व अधिकारी कर्मचारी हे उपस्थित होते.