सरकारवर कोणताही दबाव नाही; लवकरच सत्य बाहेर येईल: नवाब मलिक
आरोप तर होतच राहतात. जे आरोप करतात त्यांना तसा अधिकारही आहे. | Nawab Malik
मुंबई: भाजपकडून भ्रष्टाचारसह इतर प्रकरणांमध्ये करण्यात येणाऱ्या आरोपांमुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकासआघाडी सरकारची प्रचंड कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून सरकारची पाठराखण करण्यात आली आहे. (Nawab Malik on bjp accusations on Mahavikas Agahdi govt)
नवाब मलिक यांनी बुधवारी मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी चौकशीअंती सत्य बाहेर येईल, असा दावा केला. आरोप तर होतच राहतात. जे आरोप करतात त्यांना तसा अधिकारही आहे. पण विरोधकांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. राज्य सरकारवर कोणताही दबाव नाही. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर या प्रकरणांमधील सत्य बाहेर येईल, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
‘सरकारने अडेलतट्टुपणा सोडावा, शेतकऱ्यांचं ऐकावं’
कृषी कायद्यांना स्थगिती देणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेली संधी आहे. लोकशाहीत सरकारला कायदे करण्याचा आणि रद्द करण्याचाही अधिकार आहे. केंद्र सरकारने अडेलतट्टुपणा सोडून शेतकऱ्यांचे ऐकले पाहिजे, असे नवाब मलिक यांनी म्हटले.
पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर
मुलुंडमध्ये 5000 खाटांच्या कोव्हिड रुग्णालयासाठी 12 हजार कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्यांचा आरोप
मुलुंड येथे 5,000 खाटांचे कोव्हिड रुग्णालय उभारणीसाठी 22 एकर जमीन खरेदी करताना 12 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद असून त्याची चौकशी लोकायुक्तांमार्फत करण्यात यावी, अशी मागणीदेखील सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बृहन्मुंबई महापालिका आयुक्तांना मुंबईत 5 हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी तातडीने 22 एकर जागा अधिग्रहित करण्याचे आदेश दिले. हे आदेश देताना कोणत्याही पातळीवर चर्चा झाली नव्हती. रुग्णालय उभारण्याबाबतचा आवश्यक तो अहवालही (फिजिबिलीटी रिपोर्ट) तयार करण्यात आला नव्हता. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी जमीन अधिग्रहित करण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना दिले. या सर्व प्रक्रियेत, कोणती जमीन अधिग्रहित करायची याचा निर्णय आधीच झाला असावा. त्यानुसार मुलुंड येथील जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया अत्यंत जलदगतीने पार पाडली गेली, असे सोमय्या यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
संबंधित बातम्या:
धनंजय मुंडेंच्या कबुलीनाम्यावर परळीकर काय म्हणतायत?
बलात्कार प्रकरण भोवणार?; धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचं नेमकं काय होणार?
हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, भाजप महिला आघाडी आक्रमक
(Nawab Malik on bjp accusations on Mahavikas Agahdi govt)