यंदा काळजी नाही, धो धो कोसळणार, सरासरीच्या 103 टक्के पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशातील बहुतांश भागांत चांगला पाऊस होईल. यात मध्य आणि दक्षिण हिंदुस्थानात सरासरी 106 टक्क्यापर्यंत पावसाची शक्यता आहे.

यंदा काळजी नाही, धो धो कोसळणार, सरासरीच्या 103 टक्के पावसाची शक्यता
हलक्याशा पावसाची सुरुवात
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 9:16 AM

देशात 29 मे रोजी मान्सून दाखल झालेला आहे. त्यातच आता हवामान विभागाकडून यंदा किती पाऊस पडणार याचा अंदाच वर्तवण्यात आला आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनच्या हंगामात सरासरीच्या 103 टक्के पाऊस पडेल असा अंदाज आहे. हवामान विभागाने मंगळवारी पावसाचा अंदाज जारी केला असून या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असे म्हटले आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या 103 टक्के पाऊस होईल असा अंदाच व्यक्त केला. याआधी एप्रिलमध्ये व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजापेक्षा 4 टक्के जास्त पाऊस पडेल असे हवामान विभागाने म्हटले आहे. एप्रिलमध्ये मान्सूनचा अंदाज जाहीर करताना हवामान विभागाने सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडेल असे म्हटले होते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशातील बहुतांश भागांत चांगला पाऊस होईल. यात मध्य आणि दक्षिण हिंदुस्थानात सरासरी 106 टक्क्यापर्यंत पावसाची शक्यता आहे. तर उत्तर- पूर्व भागात सरासरीपेक्षा कामी पावसाचा अंदाज असल्याचे मोहपात्रा यांनी सांगितले.

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरी

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मागील 24 तासांत सातार बीड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस मेघगर्जनेसह पडल्याचे हवामान खात्याने सांगितले. इतरही काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मान्सूनपूर्व सरी कोसळल्या आहेत. सध्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात मान्सूनचे ढग जमले आहेत. हे ढग येत्या काही तासांत केरळ आणि कर्नाटकच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत. दक्षिणेतील राज्यांसाठी ही चांगली बातमी असल्याची माहिती हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.