प्रगती नव्हे, अधोगती! सहाय्यक आयुक्त बनणार लिपिक, कोल्हापुरातील अजब प्रकार

बोगस प्रमाणपत्राचा वापर करून बढती मिळवल्याचा ठपका असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त संजय भोसले यांच्यावर पुन्हा लिपिक पदावर पदावनती होण्याची टांगती तलवार आहे.

प्रगती नव्हे, अधोगती! सहाय्यक आयुक्त बनणार लिपिक, कोल्हापुरातील अजब प्रकार
कोल्हापूर महापालिका
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 5:38 PM

कोल्हापूरः सरकारी कार्यालयात लिपिकाला पदोन्नती घेत मोठ्या पदांपर्यंत बढतीची उदाहरण तुम्ही पाहिली असतील, पण एका सहायक आयुक्ताचा लिपिक असा प्रवास तुम्ही कधी पाहिला आहे का? हो हे खरं आहे आणि ते कोल्हापूर महापालिकेत घडण्याची शक्यता आहे. बोगस प्रमाणपत्राचा वापर करून बढती मिळवल्याचा ठपका असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त संजय भोसले यांच्यावर पुन्हा लिपिक पदावर पदावनती होण्याची टांगती तलवार आहे.

सहाय्यक आयुक्त संजय भोसले याला अपवाद ठरणार

बऱ्याचदा सरकारी कार्यालयात कनिष्ठ पदापासून ते वरिष्ठ पदापर्यंत असा बढतीचा चढता क्रम असतो. मात्र कोल्हापूर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संजय भोसले यांच्याबाबत हा क्रमच बदलण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधातील तक्रारीवर चौकशी समितीने दिलेला अहवाल याला कारणीभूत ठरणार आहे.

भोसलेंनी बनावट शैक्षणिक कागदपत्रांचा वापर केल्याची तक्रार

काही वर्षांपूर्वी संजय भोसले एक महापालिकेच्या केएमटी विभागात लिपिक म्हणून सेवेत रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्राच्या जोरावर महापालिकेत वेगवेगळ्या पदांवर बढत्या मिळवल्या. सध्या महापालिकेचे कर संग्राहक व निर्धारक म्हणूनही कार्यरत आहेत. मात्र भोसले यांनी या बढत्या मिळवत असताना बनावट शैक्षणिक कागदपत्रांचा वापर केल्याची तक्रार माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी केली होती.

तीन सदस्यीय समिती नेमून त्याचा अहवाल महापालिकेला सादर

या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने तीन सदस्यीय समिती नेमून त्याचा अहवाल महापालिकेला सादर केला आहे. ज्यात शेटे यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचा ठपका ठेवण्यात आला. या अहवालानंतर महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, कादंबरी बलकवडे यांनी संजय भोसले यांना तुम्हाला सहाय्यक आयुक्त पदावरून लिपिक पदावर पदावनती का करू नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावलीय.

संजय भोसले यांनी पात्रता नसताना महापालिकेची पद उपभोगली

संजय भोसले यांनी पात्रता नसताना महापालिकेची पद उपभोगली. या काळात त्यांनी अनेक गैरव्यवहार करून बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी आता केलाय. त्यामुळे आता संजय भोसले यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांच्या सीबीआय चौकशीची मागणी देखील शेटे यांनी लावून धरलीय. इतकंच नाही तर महाराष्ट्रात अनेक महापालिका नव्हती अशा पद्धतीने बनावट प्रमाणपत्रांचा वापर करून काही अधिकारी जनतेची लूट करत आहेत, त्याविरोधात देखील आवाज उठवणार असल्याचे त्यांनी म्हटले.

आपलं म्हणणं मांडण्यासाठी महापालिकेकडून 15 दिवसांची मुदत

दरम्यान संजय भोसले यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी महापालिकेनं पंधरा दिवसांची मुदत दिलीय. त्याच बरोबर त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केलीय. त्यामुळे आता भोसले यांच्यावरील कारवाई अटळ मानली जात आहे. आता या नोटिशीला संजय भोसले काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

संबंधित बातम्या

मुलीला स्वरक्षणासाठी दिलेले धडे ठरले जीवघेणे; मुलगी डॉक्टर व्हावी या हट्टापायी आईचा अंत

मायलेकीच्या नात्याला काळीमा, दहावीत 92 टक्के मिळवणाऱ्या मुलीकडून आईची गळा आवळून हत्या, हादरवणारी घटना

Not progress, but decline! Clerk to become Assistant Commissioner, Strange in Kolhapur municipal corporation

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.