NT Awards 2022: टीव्ही 9 मराठीला राष्ट्रीय पातळीवर 7 पुरस्कार; निखिला म्हात्रे यांचा टीव्ही न्यूज प्रजेंटर पुरस्काराने गौरव

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील हॉलिडे इन हॉटेल येथे काल संध्याकाळी न्यूज टेलिव्हिजन अवॉर्ड्स 2022 (News Television Awards 2022) या पुरस्काराने TV9 नेटवर्कला सर्वोच्च सन्मान देऊन गौरवण्यात आले. या वर्षी 40 श्रेणींमध्ये दिलेल्या एकूण 154 पुरस्कारांपैकी, TV9 नेटवर्कला 46 पुरस्कार (46 Awards) मिळाले आहेत. या पुरस्काराने टीव्ही नाईनच्या यशामध्ये आणखी एक शिरपेचात मानाचा तुरा खोवला […]

NT Awards 2022: टीव्ही 9 मराठीला राष्ट्रीय पातळीवर 7 पुरस्कार; निखिला म्हात्रे यांचा टीव्ही न्यूज प्रजेंटर पुरस्काराने गौरव
Tv9 marathi वृत्तवाहिनीला राष्ट्रीय पातळीवर सात पुरस्कारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 5:37 PM

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील हॉलिडे इन हॉटेल येथे काल संध्याकाळी न्यूज टेलिव्हिजन अवॉर्ड्स 2022 (News Television Awards 2022) या पुरस्काराने TV9 नेटवर्कला सर्वोच्च सन्मान देऊन गौरवण्यात आले. या वर्षी 40 श्रेणींमध्ये दिलेल्या एकूण 154 पुरस्कारांपैकी, TV9 नेटवर्कला 46 पुरस्कार (46 Awards) मिळाले आहेत. या पुरस्काराने टीव्ही नाईनच्या यशामध्ये आणखी एक शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 46 पुरस्काराने गौरव झाल्याबद्दल टीव्ही नाईन पुन्हा एकदा निर्विवाद क्रमांक 1 न्यूज नेटवर्क म्हणून सिद्ध झाले आहे. या 46 पुरस्कारामध्ये 7 पुरस्कार (7 Awards tv9 marathi) हे टीव्ही9 मराठीला प्राप्त झाले आहेत. या सात पुरस्कारामध्ये निखिला म्हात्रे (Nikhila Mhatre TV News Presenter Award ) यांचाही गौरव केला गेला आहे.

टीव्ही9 मराठीने वृत्तवाहिन्यांच्या क्षेत्रात नेहमीच वैविध्यता जपली आहे. कार्यक्रमापासून ते आशयापर्यंत प्रेषकांना नवनवीन माहिती देणे, गाव, तालुका, जिल्हा अशा विविध पातळीवर जाऊन काम करुन माणसांच्या समस्या असतील किंवा माणसांचा गौरव असेल तिथे टीव्ही 9 मराठी पोहचले आहे.

टीव्ही 9 मराठी अव्वल्ल

राष्ट्रीय पातळीवरील या पुरस्कारामध्ये टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीला करंट अफेअर्स स्पेशल असा असणारा आणि सायंकाळी सादर होणारा कार्यक्रम स्पेशल रिपोर्ट, बेस्ट न्यूज डिबेट शो म्हणून आखाडा तर टीव्ही न्यूज प्रजेंटर निखिला म्हात्रे यांनाही पुरस्कार प्राप्त झाला आहे. टीव्ही नाईन मराठी प्रमो कॅम्पेन, टीव्ही नाईन ब्रँड कॅम्पेन, बाप्पा मोरया या टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीला पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

तज्ज्ञांकडून वृत्तवाहिनीची गौरव

पुरस्कारासाठी सन्मानित ज्युरीमध्ये एच+के स्ट्रॅटेजीज इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुल्याणी, श्री अधिकारी ब्रदर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अधिकारी मार्कंड, ओएमडी इंडियाच्या सीईओ अनिशा अय्यर, एअरटेल व्हीपी-मीडिया अर्चना अग्रवाल, अपस्टॉक्सचे वरिष्ठ संचालक-मार्केटिंग कुणाल भारद्वाज, यांचा समावेश होता.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.