नाना पटोले किंवा विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसनं उपमुख्यमंत्री करावं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी
राष्ट्रीय ओबीसी महासंघानं काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यास ते ओबीसी नेत्याला मिळावं अशी मागणी केलीय. Nana Patole Vijay Wadettiwar
नागपूर : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा गुरुवारी दिला आहे. सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात काँग्रेसला देखील उपमुख्यमंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपद कुणाला मिळणार या चर्चा सुरु असताना राष्ट्रीय ओबीसी महासंघानं काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यास ते ओबीसी नेत्याला मिळावं अशी मागणी केलीय. नाना पटोले किंवा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना उपमुख्यमंत्री करावं, असं वक्तव्य बबनराव तायवाडे यांनी केलेय. ते याप्रकरणी काँग्रेस नेतृत्वाला पत्र लिहणार आहेत. (OBC leader Babanrao Taywade Congress should gave deputy chief minister post to Nana Patole or Vijay Wadettiwar)
काँग्रेसमध्ये सर्वाधिक ओबीसी आमदार
ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी काँग्रेसमध्ये सर्वाधिक आमदार ओबीसी समाजाचे आहेत. त्यामुळे काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यास ते ओबीसी समाजाला देण्यात यावं, अशी मागणी तायवाडे यांनी केली आहे. नाना पटोले किंवा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना उपमुख्यमंत्री करावं, असं वक्तव्य बबनराव तायवाडे यांनी केलेय.
थोरात यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद जाणार?
उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत काँग्रेसमधून बाळासाहेब थोरात यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. तसेच राज्यात सत्ता आणण्यात थोरात यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. शिवाय थोरात हे राज्यातील पक्षाचा चेहरा राहिला आहे. राज्यातील राजकारणावर त्यांची पकड आहे. तसेच नगरमध्ये विखे-पाटलांच्या सत्तेला आव्हान देण्याची धमक थोरात यांच्यात असल्याने त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देऊन पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पक्षाचा बेस वाढवण्यावर काँग्रेसचा भर आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदासाठी थोरात हे सर्वाधिक दावेदार असल्याचं मानलं जात आहे.
नितीन राऊतही चर्चेत
विद्यमान ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे नावही उपमुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आहे. राऊत हे चर्चेत असलेले मंत्री आहेत. आक्रमक नेते असून काँग्रेसमधील दलित चेहरा आहे. हायकमांडने घेतलेली भूमिका राज्यात जोरकसपणे मांडण्याचं कामही ते करत असतात. राऊत यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देऊन दलित मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. राऊत यांना उपमुख्यमंत्रीपद दिल्यास केवळ विदर्भातच नाही तर संपूर्ण राज्यात काँग्रेसला दलित मतांची बेगमी करण्यास फायदा होणार आहे. शिवाय वीज बिल माफीच्या मुद्द्यावरून राऊत यांचं ऊर्जा खातं टीकेचं लक्ष्य ठरलं आहे. त्यामुळे राऊत यांच्याकडून ही जबाबदारी काढल्यास विरोधकांच्या हातातून वीजबिल माफीचा मुद्दाही निघून जाईल. त्यामुळे वीज बिल माफीवरून काँग्रेसची मलिन होणारी प्रतिमा सावरता येईल. त्यासाठीही राऊत यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद देण्याचं काँग्रेसमध्ये घटत असल्याचं राजकीय सूत्रांनी सांगितलं.
Video | Babanrao Taywade | राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून नव्या उपमुख्यमंत्रिपदासाठी नावांची सूचना#Nagpur #BabanraoTaywade #DeputyChiefMinister pic.twitter.com/UpOlxVF6Qi
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 5, 2021
संबंधित बातम्या:
केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत, अन्यथा आंदोलनात सहभागी होणार: नाना पटोले
(OBC leader Babanrao Taywade Congress should gave deputy chief minister post to Nana Patole or Vijay Wadettiwar)