ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकी, व्हिडीओ शेअर करत केला मोठा आरोप
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकी मिळाली आहे , धमकीचा व्हिडीओ हाकेंकडून शेअर करण्यात आला आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकी मिळाली आहे , धमकीचा व्हिडीओ हाकेंकडून शेअर करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून धमकी देण्यात आली आहे, असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला आहे. त्यांच्या आरोपामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये लक्ष्मण हाके फोनवर बोलत असून समोरील माणूस त्यांना धमकी देत असल्याचे दिसत आहे. उठसूठ तुम्ही मराठ्यांना बोलताय, मनोज जरांगेंना बोलताय, असं समोरचा माणूस म्हणाला. त्यावर लक्ष्मण हाकेंनी त्यांना उत्तर दिलं. मनोज जरांगे यांनीही स्वत:चं घरदार बघाव ना. त्यावर समोरच्या माणसाने त्यांच्यावर शिव्यांचा भडिमार करत तुमची तेवढी लायकी नाही, अशा शब्दांत त्यांच्यावर हल्ला चढवला. या व्हिडीओ नंतर मोठी खळबळ माजली आहे.
धमकी मिळाल्याचा आरोप केल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. ” मला राज्यभरातून शेकडो धमक्यांचे फोन येत आहेत, जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मला शिवीगाळ केली गेली. मला जीवे मारण्याची धमकी दिलीय, महाराष्ट्रात हे काय सुरू आहे ? असा सवाल हाके यांनी उपस्थित केला. मी कुठेही आरोपीची बाजू घेतलेली नव्हती,ज्यावेळी बीड प्रकरणामध्ये सोशल वर्कर्सनी आणि लोकप्रतिनिधींनी आरोपींची आडनावं शोधून , एका कम्युनिटीला क्रिमिनलाईज्ड ठरवण्याचा प्रयत्न केला. तू कम्युनिटी माझ्या ओबीसी प्रवर्गांतर्गत येते, त्या आरोपींची आडनावं शोधून, त्या आडनावांवरून एका समजाला टार्गेट केलं गेलं. त्यावेळी मी एक ओबीसी आंदोलक म्हणून मी पुढे आलो, असं ते म्हणाले.
” तिकडे लातुरात आमदाराचा साथीदार धनगर युवकाला ऑनर किलिंगमधून ठार करतो पण कारवाई काहीच होत नाही. त्यावर समोरच्यांचे मला रोज धमक्यांचे फोन येताहेत. आजही प्रेसच्या आधी धमकीचाफोन आला. आम्ही सामाजिक न्यायाची भूमिका मांडत असताना मला जातीवादी ठरवलं जातंय. लातुरात ऑनर किलिंग झालं त्याचा का निषेध केला जात नाही ? असा सवालही हाकेंनी उपस्थित केला.
या गुन्ह्यातील डुरे नावाच्या आरोपीचे हा आमदार अभिमन्यु पवारसोबत फोटो आहेत मग त्यावर का कोणी बोलत नाही. ओबीसी बांधवांसाठी आवाज उठवत असल्यामुळेच मला टार्गेट केलं जातंय. बीड हत्याकांडावरून वंजारी समाजाला टार्गेट केलं जातंय….कालच बीडात एका ट्रँक्टर चालकाला मारहाण झाली आडनाव विचारून ही मारहाण झाली, ” असं म्हणत हाकेंनी अनेक आरोप केले.