‘कोणी उपोषण करतंय म्हणून नव्हे,पण सरकारला जर आंदोलनाची भाषा…’,काय म्हणाले लक्ष्मण हाके
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणावर ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे.
कोणीतरी माणूस उपोषणाला बसतोय म्हणून आम्हाला उपोषणाला बसण्याची आमची इच्छा नाही. आम्ही कायद्याची आणि संविधानाची भाषा बोलणारी माणसे आहोत.पण या सरकारला जर आंदोलनाची भाषा समजत असेल तर आम्ही थोडसं ‘आऊट ऑफ वे ‘ जाऊन प्रति आंदोलन करण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत.हे आंदोलन एक-दोन दिवसांमध्ये आम्ही जाहीर करू असे मत लक्ष्मण हाके यांनी लातूर जिल्ह्यातल्या अहमदपुर येथे व्यक्त केले आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद, मराठवाडा, बॉम्बे गॅझेट प्रमाणे ओबीसीतून कुणबी म्हणून नोंदी असलेल्यांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात ओबीसीचे नेते लक्ष्णण हाके यांनी देखील आता जरांगे पाटील यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी गॅझेट काढावेच ?
सोबतच जरांगे म्हणत असलेले गॅझेट कधीचे आहे ? किती सालचे आहे. हे मुख्यमंत्री महोदय तुम्ही सांगू शकता का ? हे गॅझेट नेमके कधीचे आहे ते? हे गॅझेट स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील आहे. मग स्वातंत्र्यपूर्व कालखंडातले पुरावे ग्राह्य धरले जाणार असतील तर महाराष्ट्रातल्या vjnt अ प्रवर्गाला पहिल्यांदा ST चे रिझर्वेशन द्यावे लागेल vjnt ब प्रवर्गाला SC, ST चे रिझर्वेशन द्यावे लागेल. धनगर समाजाला ST चे रिझर्वेशन द्यावे लागेल. तुम्हाला निजामाचे गॅजेटच बघायचं आहे ना….या सगळ्या ओबीसी मधल्या जाती आहेत बलुत्या मधल्या जाती आहेत. हे सगळे SC आणि ST मध्ये शिफ्ट होतील. मुख्यमंत्री महोदय तुमच्या नोलेजचा आवाका मी काढीत नाही, गॅझेटच काढायचा आहे ना लवकर काढा, असेही यावेळी लक्ष्मण हाके यावेळी म्हणाले.