Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुला जिवंत राहायचंय का?, नवनाथ वाघमारे यांना आलेल्या धमकीच्या फोनने खळबळ; अजूनही सुरक्षा नाही

नवनाथ वाघमारे यांना जीवेमारण्याची धमकी आली आहे. यासंदर्भात वडीगोद्री येथील ओबीसी समर्थकांनी जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. पोलीस प्रशासनाने सुरक्षा पुरविली तर आपण ती स्विकारु असेही वाघमारे यांनी म्हटले आहे.

तुला जिवंत राहायचंय का?, नवनाथ वाघमारे यांना आलेल्या धमकीच्या फोनने खळबळ; अजूनही सुरक्षा नाही
obc leader laxman hake and navnath waghmareImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 25, 2024 | 1:43 PM

जालना : राज्यात ओबीसी आणि मराठा असा वाद निर्माण झाला आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये या मागणीसाठी वडीगोद्रीत उपोषणाला बसलेले ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. धमकी देणाऱ्याने तुला जिवंत राहायचं की नाही असे म्हणत धमकी देण्यात आली आहे. यावेळी माझा फोन माझ्या सहकाऱ्याकडे होता. परंतू मीच बोलतोय समजून धमकी देण्यात आल्याचे वाघमारे यांनी म्हटले आहे.

नवनाथ वाघमारे हे देखील ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या सोबत वडीगोद्रीत उपोषणाला बसले होते. दहा दिवस उपोषण झाल्यानंतर सगेसोयरे अध्यादेशाची लागलीच अंमलबजावणी केली जाणार नाही असे आश्वसान सरकारच्या शिष्ठमंडळाने त्यांना दिले. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीने या दोघा ओबीसी नेत्यांनी उपोषण मागे घेतले. आपण स्वत:हून पोलिस संरक्षण मागणार नाही जर पोलिसांना काळजी असेल तर ते देतील संरक्षण असेही नवनाथ वाघमारे यांनी म्हटले आहे.

आपल्याला  झुंडशाही आणि जातीयवादी लोकांकडून अनेक वर्षापासून धमक्यांना येत आहेत. मात्र मी धमक्यांना घाबरत नाही असेही नवनाथ वाघमारे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात वडीगोद्री येथील ओबीसी समर्थकांनी जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. पोलीस प्रशासनाने सुरक्षा दिली तर आपण ती स्विकारु असेही वाघमारे यांनी म्हटले आहे.

ओबीसी आणि मराठा समाजात तेड निर्माण झाली असतानाच आता मराठा आंदोलकांनी संभाजीनगरात सोमवारी डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना घडली होती. डॉ. रमेश तारख यांनी आंतरवाली सराटीतील मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध केल्याच्या आरोपावरुन तारख यांना काळे फासण्यात आले होते. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवेदन करण्याचा हक्क आहे. एखाद्या व्यक्तीला काळे ही झुंडशाही आहे. इथे कायद्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. शाळा, मजूर आणि इतर लोकांना त्रास होत असेल म्हणून त्यांनी विरोध केला असेल. त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य देखील होते. अशा प्रकारे तोंडाला काळे फासून दबाव आणणे हे बेकायदेशीर असल्याची प्रतिक्रीया ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

कोणतेही आंदोलन कायदेशीर आणि रितसर व्हावे. लोकांना त्याचा त्रास झाला नाही पाहिजे. एका उच्छाशिक्षित माणसाच्या तोंडाला काळं फासणे योग्य नाही. गृह विभागाने यात लक्ष घालावे. उद्या काहीही होऊ शकेल. जरांगे काय मागणी करतात हे आतापर्यंत कळलेच नाही. ज्या गोष्टी मान्य होत नाहीत त्याच मागण्या ते करीत आहेत. त्या पूर्णपणे राजकीय आहेत. त्यांच्या पाठीमागे पूर्णपणे राजकीय षडयंत्र आहे. ते कोणाचा प्रचार करतात हे जनतेला माहीत असेही प्रा. लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

पाटील यांना अभ्यासू समजत होतो..पण

मनोज जरांगे यांनी आपण धमाका करणार आहे असे म्हटले आहे. त्यावर तो धमाका काय होते ते बघुयात, पण धमाका बेकायदेशीर नसावा असे त्यांनी म्हटले आहे. त्यांचे नेहमीच फुगा फुटावा असे होत आहे. आतापर्यंत आपण विनोद पाटील यांना अभ्यासू समजत होतो. मात्र विनोद पाटील यांनी मी धनगर आहे आणि ओबीसीबद्दल आंदोलन करतो असा माझ्यावर आरोप केला आहे. परंतू धनगर समाज ओबीसी मध्ये नाहीत का ? लोकांचा बुद्धिभेद करू नका ? जरांगे यांचा काडीचाही अभ्यास नाही. ओबीसींचे आरक्षण वाचले पाहिजे यासाठी आम्ही सर्व जण एक आहोत असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

मराठा समाज मागास मग पुढे कोण गेले ?

आरक्षण हे मागासवर्गीयांसाठी आहे. मराठा मागास असेल तर पुढे कोण गेला आहे ? महाराष्ट्र सरकारने इंपिरियल डाटा पुढे आणावा. मराठा समाजाच्या पुढे लोहार, कुंभार, माळी कोण पुढे गेला आहे ? परंतू इम्पिरियल डाटापासून सरकार पळ काढत आहे. जरांगे यांनी तरुणांची दिशाभूल करु नये. मराठा समाजाच्या तरुणांची उन्नती करायची असेल तर सरकारकडे अनेक योजना आहेत. खासगीकरण आणि उदात्तीकरण यामध्ये सरकारी नोकऱ्या कुठे राहिले आहेत हे जरांगे यांनी सांगावे ?

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.