कुणबी प्रमाणपत्र असेल तर ओबीसींचा आरक्षणाला विरोध नाही? देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट काय?

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीला स्फोटक मुलाखत दिली. टीव्ही 9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी त्यांना राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नावर बोलते केले. सध्याच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर काय सांगितले ते पाहा...

कुणबी प्रमाणपत्र असेल तर ओबीसींचा आरक्षणाला विरोध नाही? देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट काय?
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 28, 2023 | 8:45 PM

मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : राज्यात भाजपा पक्षांच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरूनच देवेंद्र फडणवीस यांचा जुना ‘मी पुन्हा परत येईन’ चा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार काय ? असा सवाल केला जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत टीव्ही 9 मराठी चॅनलचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी घेत त्यांना बोलते केले. या मुलाखतीत राज्यातील विविध प्रश्नांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनमोकळी उत्तरे दिली आहेत. सध्या मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाचा प्रश्न आवासून उभा असताना याचा फटका भाजपाला बसणार काय ? यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावरील अजेंडा स्पष्ट केला.

राज्यात मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरु आहे. विविध समाज घटकांची देखील यावरून चलबिचल सुरु आहे. याबद्दल भाजपाला या आरक्षण आंदोलनाचा येत्या निवडणूकात फटका बसणार का ? असा सवाल केला असता त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आणि महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाज महाराज यांच्यापुढे त्यांनी शपथ घेतली आहे. त्याचे वचन पूर्ण होण्यासाठी भाजप त्यांच्या सोबत असल्याचेही फडणवीस यांनी या मुलाखतीत सांगितले.

ओबीसींना आश्वासन दिलं…

मनोज जरांगे यांनी कुणबी म्हणून आरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. परंतू काहींना मराठा म्हणून आरक्षण हवे आहे. तो त्यांच्या हक्क आहे. त्यांना कुणबी प्रमाणपत्र नको आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाल्यासाठी शासन कठीबद्ध आहे. कुणबी प्रमाणपत्रांसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे जी बैठक झाली. त्यात जे आश्वासन दिलं आहे. कागदपत्रं तपासण्यासाठी शिंदे समिती नेमली आहे. कुणबी प्रमाणपत्र असेल तर आरक्षण द्यायला ओबीसींची ना नाहीये,. प्रमाणपत्र नसताना देऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे. गावगाड्यात सर्व एकत्र राहतात. व्यवसाय एकत्र करतात. गावगाड्यात अस्वस्थता होऊ नये असाच आमचा प्रयत्न आहे.

आरक्षणाचा निवडणुकीवर परिणाम…

समाजाची आंदोलनं आणि मागण्या या निवडणुकीच्या पलिकडे पाहिल्या गेल्या पाहिजेत. याचा पुढे भविष्यात फटका बसेल की नाही याचा विचार करत नाही. समाजाला न्याय मिळाला पाहिजे. राज्याची सामाजिक रचना बिघडणार नाही हेच आम्ही पाहत असतो. त्यामुळे आम्ही योग्य निर्णय घेऊ. त्याचा फायदा होईल अथवा न होईल याची पर्वा करणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखतीत सांगितले.

'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?.
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती.
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार.
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'.