भुजबळांच्या इशाऱ्याचा अधिकाऱ्यांनी घेतला धसका, दुसऱ्याच दिवशी अधिकारी लागले कामाला

शैलेश पुरोहित, टीव्ही 9 मराठी, इगतपुरी ( नाशिक ) : नाशिक ते मुंबई महामार्गावरील (Nashik Mumbai Highway) रस्त्यांची दयनीय अवस्था पाहून माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अधिकाऱ्यांना अनेकदा रस्त्यांच्या दुरुस्ती बाबत पत्र लिहून सूचना केल्या होत्या. मात्र, अनेकदा सूचना वजा विनंती करूनही रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नसल्याने छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला […]

भुजबळांच्या इशाऱ्याचा अधिकाऱ्यांनी घेतला धसका, दुसऱ्याच दिवशी अधिकारी लागले कामाला
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 5:43 PM

शैलेश पुरोहित, टीव्ही 9 मराठी, इगतपुरी ( नाशिक ) : नाशिक ते मुंबई महामार्गावरील (Nashik Mumbai Highway) रस्त्यांची दयनीय अवस्था पाहून माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अधिकाऱ्यांना अनेकदा रस्त्यांच्या दुरुस्ती बाबत पत्र लिहून सूचना केल्या होत्या. मात्र, अनेकदा सूचना वजा विनंती करूनही रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नसल्याने छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. बुधवारी मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना बोलावून घेत रस्त्याची पाहणी केली होती, त्यावेळी भुजबळांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत रस्त्याच्या दुरुस्तीवरुन कानउघडणी केली होती. त्याच दरम्यान 01 नोव्हेंबर रस्ता दुरुस्त केला नाहीतर टोल नाकाच बंद पडतो असा इशारा दिल होता. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी अनेकदा सांगूनही अधिकारी ऐकत नसल्याने भुजबळ चांगलेच संतापले होते. दरम्यान अधिकाऱ्यांनी भुजबळांनी दिलेल्या इशाऱ्याची चांगलीच धास्ती घेतली असून दुसऱ्याच दिवशी कामाला सुरुवात केली आहे. इगतपुरी शहराच्या हद्दीतील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे.

नाशिक ते मुंबई या महामार्गावरील रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे, त्याबाबत टीव्ही 9 मराठीने अनेकदा रस्त्यांच्या दुरुस्तीवरुन आवाज उठविला आहे.

प्रशासकीय अधिकऱ्यांना बातमीच्या माध्यमातून रस्त्याची परिस्थिती निदर्शनास आणूनही दिले होते, मात्र निगरगठ्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्षच केले होते.

इतकंच काय तर स्वतः मंत्री असतांना छगन भुजबळांनी रस्त्यापेक्षा मी रेल्वेचा प्रवास करतो अशी खंत बोलवून दाखवत रस्त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

राष्ट्रीय महामार्ग असतांना भले मोठे खड्डे पाहून छगन भुजबळांनी अनेकदा पत्रव्यवहार केला होता मात्र त्यालाही अधिकाऱ्यांनी दाद दिली नव्हती.

मात्र, छगन भुजबळ यांनी स्वतः अधिकाऱ्यांना रस्त्याची पाहणी करायला बोलवत फैलावर घेत रस्त्याच्या कामावरून चांगलीच कानउघडणी केली होती.

रस्त्याची दुरुस्ती न केल्यास थेट टोल नाकाच बंद करण्याचा इशारा छगन भुजबळांनी देताच सुस्त अधिकारी कामाला लागले आहे, आजपासून या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे.

'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.