साईबाबांच्या दानपेटीत भक्तांकडून जुन्या पाचशे, हजारांच्या नोटा; तीन कोटींपेक्षा अधिक रक्कम, साई संस्थांची डोकेदुखी वाढली

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीची घोषणा (Announcement of denomination) केली. त्यानंतर 31 डिसेंबर 2016 पर्यंत जुन्या नोटा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये स्वीकारण्यात आल्या किंवा बदलून देण्यात आल्या, परंतु या घटनेला पाच वर्ष उलटून देखील अद्यापही शिर्डी साई संस्थानच्या (Shirdi Sai Sansthan) दानपेटीत जुन्या नोटांचा ओघ सुरूच आहे.

साईबाबांच्या दानपेटीत भक्तांकडून जुन्या पाचशे, हजारांच्या नोटा; तीन कोटींपेक्षा अधिक रक्कम, साई संस्थांची डोकेदुखी वाढली
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 4:50 PM

अहमदनगर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीची घोषणा (Announcement of denomination) केली. त्यानंतर 31 डिसेंबर 2016 पर्यंत जुन्या नोटा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये स्वीकारण्यात आल्या किंवा बदलून देण्यात आल्या, परंतु या घटनेला पाच वर्ष उलटून देखील अद्यापही शिर्डी साई संस्थानच्या (Shirdi Sai Sansthan) दानपेटीत जुन्या नोटांचा ओघ सुरूच आहे. साई दर्शनाला येणारे भक्त दान पेटीमध्ये जुन्या ज्या नोटा चलनातून बाद झाल्या आहेत त्या टाकत असल्याचे आढळून आले आहे. कोट्यावधीच्या जुन्या नोटा साई संस्थानच्या तिजोरीत पडून आहेत. दरम्यान याबाबत आता काही महिन्यांपासून भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय गृह मंत्रालयाशी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती शिर्डी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. दरम्यान आता आरबीआय या नोटांबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय पातळीवर पाठपुरावा

साईबाबा संस्थानच्या तिजोरीत तीन कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे नोटबंदीला पाच वर्षे उलटली तरी आजही दानपेटीतील या जुन्या नोटांची आवक थांबलेली नाही. आज ही थोड्या फार प्रमाणात या नोटा दानपेटीतील पैशांची मोजदाद करताना आढळून येतात. गेल्या 5 वर्षांत दानपेटीत पडणाऱ्या या नोटांनी साई संस्थानची डोकेदुखी वाढवली आहे. यासाठी केंद्रीय पातळीवर अनेकदा पाठपुरावा करण्यात आला असला, तरी अद्याप यावर कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही.

इतर मंदिरांच्या दानपेटीत देखील जुन्या नोटांची शक्यता

दानपेटीत अजूनही कमी-अधिक प्रमाणात या नोटा आढळतात. अन्य देवस्थानांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरबीआयने नोंदणीकृत देवस्थानांच्या दानपेटीत टाकण्यात आलेल्या जुन्या नोटा जमा करून घ्याव्यात अशी मागणी साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. सध्या चलनातील इतर नोटा राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्यात येतात, मात्र जुन्या नोटा निघाल्यानंतर त्याची स्वतंत्र नोंद ठेवून त्यावर आयुक्तांच्या धर्मादाय प्रतिनिधींची स्वाक्षरी घेतली जाते. यानंतर त्या तिजोरीत ठेवण्यात येतात. आजवर संस्थानच्या तिजोरीत तीन कोटींपेक्षा अधिक नोटा साचलल्याची माहिती साई संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

बळीराजाचं मरण कधी थांबणार? विदर्भातला आत्महत्येचा आकडा पुन्हा वाढला

Nitesh Rane: नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा

Viral : गिफ्ट बॉक्स उघडताच नववधू आधी विचारात पडली अन् मग हसली, काय खास असेल? पाहा Video

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.