Omicron : ओमिक्रॉनचा फैलाव वाढला; नाताळ सण साधेपणाने साजरा करण्याचे पुणे महापालिकेचे आवाहन, नियमावली जाहीर
राज्य आणि स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्याचा विचार सुरु आहे. नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून सण साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच चर्च आणि अन्य ठिकाणी गर्दी करु नका असं आवाहनही महापालिकेनं केलंय.
पुणे : राज्यात ओमिक्रॉनचा (Omicron) फैलाव वाढताना दिसून येत आहे. राज्यात आज एका दिवसात ओमिक्रॉनचे 23 नवे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अशावेळी येऊ घातलेल्या नाताळ (Christmas) आणि नवीन वर्षाच्या सणाला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य आणि स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्याचा विचार सुरु आहे. नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) सण साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच चर्च आणि अन्य ठिकाणी गर्दी करु नका असं आवाहनही महापालिकेनं केलंय.
नाताळच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचं आवाहन
>> ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता नाताळ सण साधापणाने साजरा करा
>> चर्च आणि इतर ठिकाणी गर्दी करु नका
>> चर्चमध्ये प्रार्थनेसाठी केवळ 50 टक्के उपस्थिती बंधनकारक
>> सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन व्हावे, मास्कचा वापर करावा
>> चर्च परिसराचे निर्जंतुकीकरण करावे
>> चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री आयसह अन्य सजावट केल्यास गर्दी होणार नाही यासाठी उपाययोजना करा
>> चर्चबाहेर स्टॉल किंवा दुकान लावण्यास बंदी
>> मिरवणुका आणि फटाक्यांच्या आतषबाजीवरही बंदी
राज्यात आज 23 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद
राज्यात आज ओमिक्रॉन रुग्णांची उच्चांकी नोंद झाली आहे. आज दिवसभरात ओमिक्रॉनची लागण झालेले 23 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. या 23 रुग्णांपैकी 13 रुग्ण एकट्या पुण्यातील आहेत. मुंबईत 5, उस्मानाबादेत 2 आणि ठाणे, मीरा-भाईंदर आणि नागपुरात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. आज आढलून आलेल्या 23 नव्या रुग्णांमुळे राज्यातील ओमिक्रॉनची एकूण रुग्णसंख्या 88 वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव आता वेगानं होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
▶️No. of new cases of #OmicronVariant reported in the state, today – 23
(#Pune-13, #Mumbai – 5, Osmanabad- 2, Thane-1 Nagpur-1, Mira-Bhayandar – 1)
▶️Total #Omicron cases reported in state till date – 88
District-wise breakup?
(1/6) pic.twitter.com/GIXJM4Hrjd
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) December 23, 2021
राज्यात कोणत्या जिल्ह्यात ओमिक्रॉनचे किती रुग्ण?
मुंबई – 35 पिंपरी-चिंचवड – 19 पुणे ग्रामीण – 10 पुणे शहर – 6 सातारा – 3 कल्याण-डोंबिवली – 2 उस्मानाबाद – 5 बुलडाणा – 1 नागपूर – 2 लातूर – 1
इतर बातम्या :