अनंत चतुर्दशीला भाविकांसाठी रेल्वेचा खास निर्णय, रात्रभर सुरू राहणार पश्चिम रेल्वे लोकल
सध्या देशभरात गणेशोत्सव आनंदात, उत्साहात सुरू आहे. मुंबईतीही गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पहायला मिळत आहे. थोड्याच दिवसात अनंत चतुर्दशी असून मुंबईतील गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक ठिकठिकाणच्या विसर्जनस्थळी येत असतात
सध्या देशभरात गणेशोत्सव आनंदात, उत्साहात सुरू आहे. मुंबईतीही गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पहायला मिळत आहे. थोड्याच दिवसात अनंत चतुर्दशी असून मुंबईतील गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक ठिकठिकाणच्या विसर्जनस्थळी येत असतात. तेच लक्षात घेऊन भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या वतीने गणेशभक्तांसाठी अनंत चतुर्दशीच्या रात्री लोकलच्या जादा आठ फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील बहुसंख्य सार्वजनिक मंडळांच्या आणि घरगुती गणपतीचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होते. त्यामुळे विसर्जन सोहळ्यानिमित्त गिरगाव, दादर, जुहू आदी चौपाट्यांवर भाविकांची प्रचंड गर्दी होते.
भाविकांची हीच मोठी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने मंगळवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी चार लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विसर्जनासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांना रात्री उशीरादेखील घरी परतता येणार आहे.
कोकणातून परतीचा प्रवास होणार सुखावह, गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी १४ विशेष रेल्वे
गणेशोत्सवकाळात गणेशभक्तांसाठी मध्य आणि कोकण रेल्वे खेड – सीएसएमटी, खेड – पनवेल दरम्यान १४ अनारक्षित गणपती विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. या रेल्वे गाड्यांमुळे कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गाडी क्रमांक 01069 अनारक्षित विशेष सीएसएमटी येथून 12 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 ० वाजता सुटेल.
खेड येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 5.15 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01070 अनारक्षित विशेष खेड येथून 16 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता पोहोचेल. या रेल्वे गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी आणि कळंबणी बुद्रुक येथे थांबा देण्यात येणार आहे.
तर अनारक्षित विशेष गाडी पनवेल येथून 13, 14, 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सुटेल आणि खेड येथे त्याच दिवशी दुपारी 2.45 वाजता पोहोचेल
परतीसाठी अनारक्षित रेल्वे 13, 14, 15,सप्टेंबर रोजी दुपारी 3.15 वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी रात्री 8.30 वाजता पोहोचेल.
तसेच अनारक्षित विशेष पनवेल येथून 13, 14, आणि 15 सप्टेंबर रोजी रात्री 9.10 वाजता सुटेल. तर अनारक्षित विशेष 13, 14, 15 सप्टेंबर रोजी खेड येथून सकाळी 6वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी सकाळी 10 वाजता पोहोचेल.