पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंचं परदेशी पाहुण्यांना आकर्षण, कुठे-कुठे करणार हेरिटेज वॉक
G20 परिषदेच्या बैठकीसाठी आलेले परदेशी पाहुणे पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंना देणार भेट आहे, त्याचे नियोजन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
अभिजीत पोते, टीव्ही 9 मराठी, पुणे : पुण्यात G20 परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या G20 परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान भारताला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखळी देशातील महत्वाच्या शहरांमध्ये विविध विषयांवर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यानुसार पुण्यातील G20 परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी परदेशी पाहुण्यांची देखील उपस्थिती लाभली आहे. परदेशी पाहुणे G20 परिषदेच्या सर्वच कार्यक्रमांमध्ये हिरीरीने सहभागी होत असून पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील वाद्यांचा त्यांनी आनंद लुटला होता. आताही परदेशी पाहुण्यांना पुण्यातील ऐतिहासिक वस्तूंना भेटी देण्याचा मोह आवरला नाहीये. त्याच पार्श्वभूमीवर आज परदेशी पाहुण्यांचा हेरीटेज वॉक आयोजित करण्यात आला आहे.
G20 परिषदेच्या बैठकीसाठी आलेले परदेशी पाहुणे पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंना देणार भेट आहे, त्याचे नियोजन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
आज सकाळी G20 परिषदेच्या बैठकीसाठी आलेले सर्व राजदूत पुण्यातील शनिवार वाडा, लाल महाल तसेच नाना वाडा या ऐतिहासिक ठिकाणी हेरिटेज वॉक करणार आहेत.
याशिवाय ही सर्व परदेशी पाहुणे मंडळी हेरीटेज वॉक करून झाल्यावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला देखील भेट देणार आहेत, हेरीटेज वॉक आणि त्यानंतर देवदर्शन असा एकत्रित दौरा आज होणार आहे.
पुण्यात या परदेशी पाहुण्यांची मोठी उठाठेव केली जात आहे. त्यांच्या स्वागताला ठिकठिकाणी रांगोळ्या, रस्त्याच्या मधोमध ठिकठिकाणी झाडे लावली जात आहे, सगळं छान करता येईल असा प्रयत्न आहे.
पुण्यातील शनिवार वाडा, लाल महाल आणि नाना वाडा या ऐतिहासिक स्थळी परदेशी पाहुणे इतिहास जाणून घेणार आहे, याशिवाय वाडा संस्कृती नेमकी काय आहे? याचीही माहिती त्यांना यामधून मिळणार आहे.
पुण्यात गेल्या आठवडाभरापासून G20 परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने करण्यात आलेले आयोजन चर्चेचा विषय ठरत असतांना आज परदेशी पाहुण्यांना ऐतिहासिक स्थळी भेटी घडवून आणण्याचे प्रयोजन असल्याने या बैठकीची अधिकच जोरदार चर्चा होत आहे.