“अधिवेशन संपले की शेतकऱ्यांची वीज तोडली जाणार”; राष्ट्रवादीच्या नेत्यानं सरकारचं धोरण सांगितलं

सरकारने वीज वितरण कंपनीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जोपर्यंत अधिवेशन सुरू आहे तोपर्यंत कारवाई करू नका अधिवेशन संपले की तुम्हाला काय करायचं ते करू शकता असा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे.

अधिवेशन संपले की शेतकऱ्यांची वीज तोडली जाणार; राष्ट्रवादीच्या नेत्यानं सरकारचं धोरण सांगितलं
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 5:15 PM

अहमदनगरः हिवाळी अधिवेशन चालू झाल्यापासू विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासू शेतकऱ्यांनी शेतातील पिकावर नांगर फिरवला असून काही शेतकऱ्यांनी आलेली पिकं नदीत फेकून दिली आहेत.एकीकडे ही समस्या असतानाच आणि शेतकरी अडचणीत सापडलेला असतानाच दुसरीकडे मात्र सरकारने शेतकऱ्यांवर अन्यायकारक भूमिका बजावत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जंयत पाटील यांनी टीका केली आहे.

आमदार जयंत पाटील सध्या अहमदनगर दौऱ्यावर आहेत.ते अहमदनगरला पिंपळगाव माळवी येथे बोलत होते. त्यावेळी बोलताना त्यांनी सरकार आता कशा पद्धतीन शेतकऱ्यांवर कारवाई करत आहे त्याविषयी स्पष्ट मत मांडले.

सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे मात्र सरकारच्या काही अन्यायकारक गोष्टींमुळे शेतकरी अडचणीत आल्याचे म्हटले आहे.आमदार जयंत पाटील यांनी सांगितले की, अधिवेशन संपले की शेतकऱ्यांची वीज तोडली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी ते म्हणाले की, राज्यसरकाराने वीज तोडण्याबाबतचा निर्णय घेतला आहे त्यामुळे शेतकरी काही दिवसांनी अडचणीत येण्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. यावेळी शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे.

आलेल्या पिकाला योग्य बाजारभाव नसल्याने शेतातील पीक नदीत टाकण्याचे, त्याच्यावर ट्रॅक्टर फिरवण्याचे वाईट दिवस शेतकऱ्यांवर आले आहेत. तरीही शेतकऱ्यांबाबत वेगवेगळे निर्णय घेण्याचे सरकार काम करत आहे आणि शेतकऱ्यांची चेष्टा करत असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.

तसेच सरकारने वीज वितरण कंपनीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जोपर्यंत अधिवेशन सुरू आहे तोपर्यंत कारवाई करू नका अधिवेशन संपले की तुम्हाला काय करायचं ते करू शकता असा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे.

तर वीज कनेक्शन तोडा पण वीज वसुली झालीच पाहिजे असा आदेशही अधिकाऱ्यांनी दिल्याचा गंभीर आरोप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले आहेत तरीही सरकार शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार कर नाही. त्यामुळे सरकार गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांबाबत अन्यायाकारक भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.