Swine Flu :अंबरनाथमध्ये स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू; ठाणे, कल्याण-डोंबवलीसह बदलापूरमध्ये रुग्णांची वाढती संख्या धडकी भरवणारी

अंबरनाथमध्ये(Ambernath) स्वाईन फ्लूने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ठाणे, कल्याण-डोंबवलीसह( Kalyan Dombvali ) बदलापूरमध्ये(Badlapur) स्वाईन फ्लूच्या रुग्णांची वाढती आकडेवारी धडकी भरवणारी आहे.

Swine Flu :अंबरनाथमध्ये स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू; ठाणे, कल्याण-डोंबवलीसह बदलापूरमध्ये रुग्णांची वाढती संख्या धडकी भरवणारी
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 5:28 PM

ठाणे : राज्यात कोरोनाचे(Corona) अनेक रुग्ण सापडत आहेत. त्यातच मंकी पॉक्सची(Monkey pox) दहशतही निर्माण झाली आहे. कोरोनासह राज्यात स्वाईन फ्लू(swine flu ) धोका पुन्हा एकदा वाढत आहे. अंबरनाथमध्ये(Ambernath) स्वाईन फ्लूने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ठाणे, कल्याण-डोंबवलीसह( Kalyan Dombvali ) बदलापूरमध्ये(Badlapur) स्वाईन फ्लूच्या रुग्णांची वाढती आकडेवारी धडकी भरवणारी आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. नागरीकांना देखील खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अंबरनाथमध्ये स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू

अंबरनाथ पूर्वेला राहणाऱ्या 71 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय. 22 जुलै रोजी या व्यक्तीची स्वाईन फ्लू टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तर 23 जुलै रोजी डोंबिवलीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

बदलापूर शहरात स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर आता जगभरात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूचा प्रसार वाढू लागलाय. त्यातच ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर शहरात स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला. बदलापुरातील एका वयोवृद्ध डॉक्टरला स्वाईन फ्लूची लागण झाली असून परदेशातून आलेल्या एका नातेवाईकमुळे ही लागण झाल्याचं बदलापूर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी सांगितलंय. स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळल्यानंतर संबंधित रुग्णाच्या परिसरात आरोग्य विभागाने ट्रेसिंग सुरू केलं आहे. बदलापूर शहर हे मुंबईजवलील सॅटेलाईट शहारांपैकी एक समजलं जातं. कारण या शहरात मुंबई आणि नवी मुंबईत कामाला जाणारे चाकरमानी सर्वाधिक संख्येने वास्तव्याला आहेत. कोरोना काळात बदलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळं स्वाईन फ्लूच्या पार्श्वभूमीवर बदलापूर पालिकेच्या आरोग्य यंत्रणेसह नागरिकांनी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे.

ठाण्यात स्वाईन फ्ल्यूने डोकं वर काढले

वातावरणातील बदल आणि पाऊस यांमुळे ठाण्यातील वातावरणात बदल झाला आहे. या बदलामुळे साथीच्या आजाराने डोकं वर काढले आहे. व्हायरल तापाचे प्रमाण सर्वाधिक असून स्वाईन फ्ल्यू च्या आजारामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. ठाण्यात कोरोनासह आता स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढले असून आतापर्यंत दोन जण दगावल्याने नागरिकांमध्ये स्वाईन फ्ल्यूची धास्ती वाढत आहे. एकट्या ठाण्यात जुलै महिन्यात स्वाईन फ्लूचे 20 रुग्ण आढळून आले असून यातील 15 जणांना उपचार घेऊन घरी पाठवण्यात आले आहे. तर 3 रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. यापैकी 2 रुग्ण हे ठाणे हेल्थ केअरमध्ये उपचार घेत असून एक रुग्ण हा ज्युपिटरला दाखल आहे. यामुळे सतर्क झालेल्या ठाणे महापालिका प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्या बरोबरच पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमध्ये स्वाईन फ्ल्यू कक्ष सज्ज ठेवला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. तर पालिका प्रशासन सतर्क झाली असून संपर्कात असलेल्या 600 हुन अधिक जणांच्या घरामध्ये सर्वेक्षण करून तपासणी करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.