Kolhapur North By Election 2022 : कोल्हापूर उत्तरमध्ये मतमोजणी सुरू असतानाच एक ईव्हीएम मशीन बंद; व्हीपॅटची मोजणी सुरू

Kolhapur North By Election 2022 : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी अजून सुरू आहे. एकूण 26 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. आतापर्यंत 18 फेऱ्यांची मोजणी यशस्वी झाली आहे. मात्र, 19व्या फेरीत एक मशीन बंद पडल्याने व्हीपॅट मशीची मोजणी सुरू करण्यात आली आहे.

Kolhapur North By Election 2022 : कोल्हापूर उत्तरमध्ये मतमोजणी सुरू असतानाच एक ईव्हीएम मशीन बंद; व्हीपॅटची मोजणी सुरू
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 12:41 PM

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची (Kolhapur North Election Result) मतमोजणी अजून सुरू आहे. एकूण 26 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. आतापर्यंत 18 फेऱ्यांची मोजणी यशस्वी झाली आहे. मात्र, 19व्या फेरीत एक मशीन बंद पडल्याने व्हीपॅट मशीची मोजणी सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (jayshree jadhav)  यांनी एकूण 14 हजार मतांची आघाडी घेतली आहे. तर, सत्यजित कदम (satyajeet kadam) यांना कोणत्याही फेरीत म्हणावी तशी लीड घेता आलेली नाही. जाधव यांच्या लीडच्या तुलनेत त्यांना दोनचार फेऱ्यांमध्ये किरकोळ लीड मिळाली. पण मोठं यश येऊ शकलं नाही. आता तर फक्त सातच फेऱ्या उरल्या आहेत. पहिल्या फेरीपासूनच जाधव या आघाडीवर असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे जाधव समर्थकांनी शहरात त्यांच्या विजयाचे पोस्टर्स आणि बॅनर्स लावले असून त्यांच्या विजयाचं अभिनंदन केलं आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीपासून ते 18 व्या फेरीपर्यंत ही मतमोजणी अत्यंत चांगली पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. कुठलाही गोंधळ झाला नाही आणि कुणीही मतमोजणीवर आक्षेपही घेतला नाही. मात्र, 19 व्या फेरीवेळी मशीन बंद पडल्याचं आढळून आलं. एक ईव्हीएम मशीन बंद असल्याने व्हीपॅट मशीनच्या मतांची मोजणी करण्यात आली. 19व्या फेरीत फिरंगाई येथील 6 बूथ आणि गंजी माळ येथील 7 बूथचा समावेश आहे.

14 हजार मतांची लीड

19 व्या फेरीत जयश्री जाधव यांना 3259 मते मिळाली. तर सत्यजित कदम यांना 2974 मते मिळाली. या फेरीत जाधव यांनी 285 मतांची लीड घेतली आहे. तर त्यांनी एकूण 14,140 मतांची लीड घेतली आहे. त्यामुळे जाधव यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

मतदारांचा कौल मान्य

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. जनतेने कौल दिला आहे. त्यांचा कौल आम्हाला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

कोल्हापूर समतेची भूमी

कोल्हापूर समतेची आणि प्रबोधनाची भूमी आहे. त्यामुळेच कोल्हापुरांनी धार्मिक धृवीकरण नाकारले आहे. कोल्हापूरचा विचार समतेचा, प्रबोधनाचा आहे. कोल्हापूर छत्रपती शाहू महाराजांचे, महाराणी ताराबाईंचे आहे, असं ट्विट काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या:

Kolhapur Election Result 2022 LIVE : भाजपची शेवटची आशाही संपली? 22 फेऱ्यांनंतरचे चित्र काय?

Maharashtra News Live Update : …तर मातोश्री रावनाची लंका होईल; रवी राणांचा उद्धव ठाकरेंना टोला

Sanjay Raut on BJP: रामाचा बाण, हनुमानाची गदा आमच्याकडे, विरोधकांचा भोंगा जनतेने नाकारला; राऊतांचे नाशिकमध्ये फटाके

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.