Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिक्षकांचा ‘तो’ एक प्रश्न आणि सगळ्या सभागृहाने हात वर केले, शिक्षणमंत्री झाले हैराण, म्हणाले…

मंत्री दीपक केसरकर यांनी सर्व सभागृह शिक्षकांच्या प्रश्नाबद्दल सकारात्मक असल्याची कोपरखळी लगावली. एका दिवसात सगळे प्रश्न सुटू शकत नाही. पण जेवढे सुटू शकतील तेवढे सोडवू आणि त्याचा अहवाल सभागृहात देऊ असे सांगितले.

शिक्षकांचा 'तो' एक प्रश्न आणि सगळ्या सभागृहाने हात वर केले, शिक्षणमंत्री झाले हैराण, म्हणाले...
MLC SATYAJEET TAMBEImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 6:52 PM

मुंबई । 24 जुलै 2023 : विधानपरिषद सभागृहात शिक्षक, पदवीधर मतदारसंघामधून येतात. मात्र, ज्या मतदारांच्या मतांवर हे आमदार निवडून येतात त्यांच्याच प्रश्नांना न्याय मिळत नसल्याचे वारंवार दिसून येते. असा थेट आरोप नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केला. शिक्षण क्षेत्र अत्यंत महत्वाचे आहे. राज्याचा मोठा बजेट शिक्षण खात्याला दिला जातो. वारंवार प्रश्न येतात, त्यावर चर्चा होते पण त्याचे उत्तर गोलमाल येते. त्यामुळे शिक्षण क्षेत्रासाठी एक दिवसीय विशेष बैठक घेण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.

विधान परिषदेत शिक्षक आमदारांनी शिक्षकांचे मानधन, त्यांच्या समस्यांना वाचा फोडली. त्याला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षकांचे अनेक पूर्ण असल्याचे मान्य केले. त्यातील काही प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होते. पण, गेल्या एका वर्षात अनेक विषय सोडवले. तरीही हा विषय एका तासात संपणार नाही. त्यामुळे हे अधिवेशन संपल्यानंतर पूर्ण दिवस बैठक घेतली जाईल असे आश्वासन दिले.

हे सुद्धा वाचा

आमदार सत्यजित तांबे यांनी राज्यात कनिष्ठ, माध्यमिक, प्राथमिक, ग्रंथपाल तसेच अशा अनेक संघटना आहेत. त्यांचे अनेक प्रश्न आहेत. सगळ्या शिक्षण विभागाची एक दिवसीय बैठक घेण्याचे शिक्षणमंत्री यांनी सांगितले. परंतु, राज्यात बेरोजगारी वाढत आहे. अनेक शिक्षकांना नोकऱ्या नाहीत. असे असताना सरकारने निवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. हा निर्णय सरकारने मागे घेऊन जे बेरोजगार शिक्षक आहेत त्यांना नियुक्त करावे अशी मागणी केली.

सभागृहात या विषयावर चर्चा सुरु असताना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी मंत्री यांनी एक दिवसीय बैठक घेण्याचे मान्य केले आहे. त्यासाठी जे काही प्रश्न असतील ते त्यांना लिहून द्यावे. तसेच जे बैठकीला जाणार आहेत त्यांनी आपली नावे द्यावे असे उपसभापती यांनी सांगताच सभागृहातील सर्व सदस्यांनी हात उंचावले.

राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी या विषयावर बोलायचे आहे असे म्हणताच उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बैठक घेण्याचे मान्य केले आहे. एक दिवस देणार आहेत. मात्र, या बैठकीत राजकीय भाषण करू नका. सांगलीला जायचे असेल तर सोलापूरला गाडी नेता, असा टोला लगावला. याचवेळी काही सदस्य खाली बसून बोलत असताना त्यांनी खाली बसून बोलणे शिक्षकांना शोभत नाही अशी कोपरखळी लगावली.

'अजितदादा... जरा जमिनीवर या', करूणा शर्मांनी अजित पवारांना फटकारलं
'अजितदादा... जरा जमिनीवर या', करूणा शर्मांनी अजित पवारांना फटकारलं.
हल्ले करणारे चेहरे ओळखीचेच; नागपूर प्रकरणावर राऊतांचा गंभीर आरोप
हल्ले करणारे चेहरे ओळखीचेच; नागपूर प्रकरणावर राऊतांचा गंभीर आरोप.
'सत्तेतील एक मंत्री वळवळ करतोय', नागपुरातील रड्यावरून वडेट्टीवार भडकले
'सत्तेतील एक मंत्री वळवळ करतोय', नागपुरातील रड्यावरून वडेट्टीवार भडकले.
विधानभवना बाहेर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
विधानभवना बाहेर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल महागणार, आता किती भरावा लागणार टोल?
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल महागणार, आता किती भरावा लागणार टोल?.
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'.
नागपुरात कलम 144 लागू, राड्यानंतर तणावपूर्ण शांतता; नेमकं काय घडलं?
नागपुरात कलम 144 लागू, राड्यानंतर तणावपूर्ण शांतता; नेमकं काय घडलं?.
जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.