एक मनोयात्री, दुसरी अवघ्या बावीस दिवसांची, सहा वर्ष ‘तो’ अस्वस्थ, आणि ती भेटली तेव्हा…

बावीस दिवसांच्या बाळाला अंथरुणात सोडून जाणाऱ्या मानसिक रुग्ण पत्नीला पुन्हा आपल्या अंगणात पाहून पतीला किती आनंद होईल? ती घर सोडून गेली त्या दिवसाचा राग अजूनही त्याच्या मनात असेल का? मुलीच्या पुढील काळजीने तो बाप किती अस्वस्थ झाला असेल?

एक मनोयात्री, दुसरी अवघ्या बावीस दिवसांची, सहा वर्ष 'तो' अस्वस्थ, आणि ती भेटली तेव्हा...
DIVYA SEVA PRAKALPImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 5:16 PM

बुलढाणा : सहा वर्षांपूर्वी ती घर सोडून गेली होती. अवघ्या २२ दिवसांच्या मुलीला सोडून जाताना तिला काहीच कसं वाटलं नाही हा प्रश्न सर्वासमोर होता. त्या लहान मुलीचा बाप तर त्या कोवळ्या मुलीच्या दुधाचा आणि संगोपनाच्या विचारांमुळेच खूप अस्वस्थ झाला होता. अचानक ती गेल्यामुळे त्याच्या मनात राग होता. संताप होता. पण, तरीही तो आपल्या मुलीसाठी तिचा शोध घेत होता. आता सहा वर्षानंतर ती पुन्हा त्यांच्यासमोर आली. गेल्या सहा वर्षात आईच तोंडही न पहाणारी तेव्हाची ती बावीस दिवसांची मुलगी आता सहा वर्षाची झाली. तिने तिला पाहिले आणि नकळत ही कोण असा प्रश्न तिच्यासमोर उभा ठाकला. तिला पाहून नवऱ्यानेही सुटकेचा श्वास सोडला. कारण त्याचा शोध संपला होता. त्याच्या मुलीला गोंजारणारे हात त्याला पुन्हा मिळाले.

सहा वर्षांनंतर भेटणाऱ्या आपल्या पत्नीला बघून पतीची अवस्था कशी होईल? सहा वर्षांनंतर आपल्या सहा वर्षांच्या मुलीला भेटल्यानंतर आईला काय वाटेल? त्या मुलीचा प्रतिसाद कसा असेल? बावीस दिवसांच्या बाळाला अंथरुणात सोडून जाणाऱ्या मानसिक रुग्ण पत्नीला पुन्हा आपल्या अंगणात पाहून पतीला किती आनंद होईल? ती घर सोडून गेली त्या दिवसाचा राग अजूनही त्याच्या मनात असेल का? मुलीच्या पुढील काळजीने तो बाप किती अस्वस्थ झाला असेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे काळावर सोपवून त्यांच्या प्रवास पंढरपूर शहराच्या दिशेने सुरु होता.

हे सुद्धा वाचा

पाच महिन्यांपूर्वी लातूर पोलिसांच्या मदतीनं लता ( नाव बदललेले आहे) नावाच्या मनोयात्री महिलेला बुलडाण्याच्या दिव्य सेवा प्रकल्पात आणले होते. अत्यंत विदारक परिस्थितीत असणारी लता उपचारांना छान प्रतिसाद देत होती. दिव्य सेवा मनोयात्री प्रकल्पात असताना काही काळातच तिच्या मनोवस्थेत आमूलाग्र बदल होत होता.

लतामध्ये जशी सुधारणा होत होती तशी तिची माहिती मिळत होती. नांदेडमध्ये माहेर आणि पंढरपूरमध्ये तिचं सासर इतकीच माहिती मिळाली होती. त्यामुळे मनोरुग्ण पण आता पूर्ण बरी झालेल्या लताचे घर शोधून काढणं महाकठीण काम होतं.

दिव्य सेवा प्रकल्पाचे अशोक काकडे यांनी लताचे घर शोधून तिला घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न सुरु केला. लताचे फोटो आणि माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली. पंढरपूरच्या एका सामाजिक कार्यकत्याने ही पोस्ट पाहिली. त्याने पंढपूरच्या स्थानिक समूहावर ती पोस्ट केली. या पोस्टमुळे लताच्या घरच्यांची माहिती मिळाली.

अशोक काकडे यांनी तिच्या नवऱ्यासोबत बोलणे केले. पंढरपूरमध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय करणारा तिचा नवरा अजूनही तिची वाट पहात होता हे जेव्हा त्यांना कळले तेव्हा त्यांनी लताला तिच्या घरे नेण्याची तयारी सुरू केली.

मुलीच्या जन्मानंतर मनोयात्री झाली ?

लग्नांनंतर दोन वर्षांनी लता प्रेग्नंट राहिली. डॉक्टरांनी सीझर करावे लागेल असा सल्ला दिला होता. मात्र, घराची आर्थिक परिस्थिती अगदीच हलाखीची होती. त्यामुळे सीझरच्या खर्च झेपेल का या विचाराने ती अस्वस्थ झाली होती. तिने मुलीला जन्म दिला. त्यावेळी दोन दिवस तिला मुलीला भेटू दिले नव्हते. त्यामुळे ती अधिकच स्ट्रेसमध्ये गेली.

सीझर काळात काही महिला स्ट्रेसमध्ये जातात. मात्र, लता इतकी स्ट्रेसमध्ये गेली की तिच्या मेंदूवर त्याचा हळूहळू परिणाम होत होता. आपल्या बाळाचे पुढे कसे होणार या काळजीने ती अधिकच अस्वस्थ होत होती. एक एक दिवस जात होता पण तिचे विचित्र वागणे वाढतच होते. अखेर, एक दिवस कुणाला काही न सांगता ती घर सोडून गेली.

पंढरपूरची लता लातूरमध्ये सापडली आणि दिव्य सेवा प्रकल्पात पोहोचली

लता घर सोडून सहा वर्ष झाली. दरम्यानच्या काळात ती कुठेही फिरायची. जवळपास अर्धा महाराष्ट्र तिने पालथा घातला होता. पंढरपूर, सोलापूर, जालना असे करत करत ती लातूरला पोहोचली. तेथील सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील, सय्यद मुस्तफा, असिफ पठाण, आशिष गायकवाड यांनी तिला पाहिले.

मनोयात्री रुग्णांसाठी काम करणाऱ्या अशोक काकडे यांच्या दिव्य सेवा प्रकल्पाची त्यांना माहिती होती. त्यांनी लातूर पोलीस स्टेशन गाठले आणि लताची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनीही कुठलेलंही आढेवेढे न घेता दिव्य सेवा प्रकल्पात पाठविण्याची सगळी प्रोसेस करून दिली.

दिव्य सेवा प्रकल्पात आल्यानंतर लतामध्ये सुधारणा

पाच महिन्यापूर्वी लताला जेव्हा दिव्य सेवा प्रकल्पात आणण्यात आले तेव्हा ती आधी कुणाशी बोलत नसायची. सर्वाना दगड मारत असायची. मनोयात्रीमध्ये असणारे सगळे गुण तिच्यात सामावले होते. माझी मुलगी एक महिन्याची आहे. तीन महिन्याची आहे, दोन वर्षाची आहे असे ती सतत काही ना काही बडबडत असे.

हळूहळू तिची सर्वांसोबत ओळख झाली. दिव्य सेवा प्रकल्पातल्या सेवाव्रतींनी औषध, गोळ्या देतानाच तिच्याशी संवाद साधायला सुरवात केली. परिणामी ती आता नॉर्मल होऊ लागली. निव्वळ अलोपॅथिक गोळ्या मनोयात्रीला बऱ्या करू शकत नाहीत. तर, सेवाव्रतींची मेहनतही अशा वेळी फळाला येते.

घरच्यांनी केले असे स्वागत

दिव्य सेवा प्रकल्पाचे अशोक काकडे सांगतात, लताच्या नवऱ्यासोबत बोलणे झाल्यानंतर आम्ही लताला सोडण्यासाठी पंढपूरला निघालो. बुलढाण्यातील प्रकल्पातून पंढरपूरला तिच्या घरी नेण्यासाठी डॉ सुकेश झंवर, ज्योती पाखरे, प्रभू दयाल चव्हाण, डॉ. गणेश गायकवाड, डॉ. गजेंद्र निकम सर यांची मदत झाली.

आम्ही लताला घेऊन तिच्या घरी गेलो. तिचा पती आणि मुलगी घराच्या चौकटीला धरून सामसूम उभे होते. मी पुढं झालो आणि लताला बोट करून ‘ती तुझी मुलगी’ असं सांगितल्यावर तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

अवघ्या बावीस दिवसांची असताना आपल्याला सोडून गेलेली आई पुन्हा सापडल्याचा अभूतपूर्व आनंद तिच्या मुलीच्या चेहऱ्यावरून ओसंडून वहात होता. आपल्या आईचा हात हातात घेऊन तिनं गालावर गोड पप्पी घेतली. सहा वर्षांतली सगळी उणीव भरून काढली. समोरचा हा प्रसंग बघताना तिथं उभे असणाऱ्या लोकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. हे सगळं एवढं समाधानकारक घडल्यावर आम्हांला चंद्रभागेत न्हाल्याचा आणि पांडुरंग भेटल्याचा आनंद झाला.

लता आता तिच्या कुटुंबात परतलीय. ती आता बरी झालीय. तिला शोधण्याचा तिच्या नवऱ्यानं खूप प्रयत्न केला होता तो शोध आता संपलाय. मुलीला गोंजारणारे हात मिळालेत. ज्यांनी या माय माऊलीला आपल्या प्रकल्पावरती पाच महिन्यापूर्वी दाखल केले त्यांनाही समाधान मिळाले. आणि आम्हाला एका मनोयात्रीला बरे करून पुन्हा तिचे घर मिळवून देण्याचा आनंद मिळाला, अशोक काकडे सांगतात.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.