सोहळे, समारंभ, पुष्पगुच्छ, होर्डींग्ज, जाहिरातींवरील खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत करा; वाढदिवस साजरा न करण्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा निर्णय

अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे राज्यात शंभरहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पशुधनाची झालेली हानी, शेतजमिन व पिकांचं नुकसान, घरांची व दुकानांची पडझड, या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 22 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोहळे, समारंभ, पुष्पगुच्छ, होर्डींग्ज, जाहिरातींवरील खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत करा; वाढदिवस साजरा न करण्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा निर्णय
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 10:00 PM

मुंबई : महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुर स्थिती निर्णाम झाली. यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार(Opposition leader Ajit Pawar ) यांनी वाढदिवस(birthday) साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. सोहळे, समारंभ, पुष्पगुच्छ, होर्डींग्ज, जाहिरातींवरील खर्च टाळून त्या निधीतून पूरग्रस्त शेतकरी, विद्यार्थ्यांना मदत करावी असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे राज्यात शंभरहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पशुधनाची झालेली हानी, शेतजमिन व पिकांचं नुकसान, घरांची व दुकानांची पडझड, या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 22 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसंच हितचिंतकांनी माझा वाढदिवस साजरा करु नये, वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून तो निधीतून राज्यातील पूरग्रस्त शेतकरी, विद्यार्थ्यांना मदत करावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी कोणत्याही सोहळे-समारंभांचे आयोजन करु नये, पुष्पगुच्छ पाठवू नयेत, होर्डिंग्ज् लावू नयेत, वृत्तपत्रे, टिव्ही, समाजमाध्यमांवर जाहिराती प्रसारित करु नयेत, यावर होणारा खर्च वाचवून त्या निधीतून पूरग्रस्त शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना मदत करावी. लोकोपयोगी उपक्रमांचं आयोजन करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.