विरोधी पक्षनेते की मंत्री? धनंजय मुंडे संतापले म्हणाले ऐकण्याची तसदी घ्या, मी…

सदनामध्ये सत्तापक्षाकडून प्रस्ताव आला किंवा विरोधी पक्षाकडून प्रस्ताव आला तर फक्त टीका करायला उभे रहायचे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. टीका करायची म्हणून टीका केली. पण कधी तरी सरकारच्या चांगल्या कामाची स्तुती करा.

विरोधी पक्षनेते की मंत्री? धनंजय मुंडे संतापले म्हणाले ऐकण्याची तसदी घ्या, मी...
MINISTER DHANANJAY MUNDE
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 12:49 PM

मुंबई । 24 जुलै 2023 : राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध सवलती, योजना याबाबत तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत विधानपरिषदेत सत्ताधारी पक्षाने नियम २६० अन्वये चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले. मात्र, हे उत्तर देत असताना मंत्री मुंडे यांना कधी काळी याच सभागृहात आपण विरोधी पक्षनेते होतो याची आठवण झाली. त्यावेळी आपण जनतेच्या प्रश्नांबाबत किती संवेदनशील होतो हे सांगत असतानाच त्यांनी विरोधी पक्षनेते यांच्यावर सडकून टीका केली.

धनंजय मुंडे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तरुण, तडफदार नेतृत्व म्हणून अजित पवार यांनी मुंडे यांच्याकडे मोठ्या विश्वासाने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली. त्यावेळी सत्ताधारी पक्षावर विरोधी पक्षनेते म्हणून धनंजय मुंडे तुटून पडत असत. आज विधान परिषदेत सकाळच्या विशेष सत्रात धनंजय मुंडे यांना आपल्या त्यावेळच्या कामगिरीची आठवण झाली.

हे सुद्धा वाचा

सकाळच्या विशेष सत्रात सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या प्रश्नाला कृषिमंत्री धनंजय मुंडे उत्तर देत होते. मात्र, यावेळी सभागृहात विरोधी पक्षाचा एकही सदस्य उपस्थित नव्हता. हे पाहून धनंजय मुंडे संतापले. या सदनामध्ये मी विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. कधी सरकारच्या विरोधात होतो तर कधी सरकारच्या बाजूने होतो. पण, सत्तापक्षाच्या ठरावावर उत्तर देत असताना सभागृहात विरोधी पक्षाचे कुणीच नाही असा सवाल त्यांनी केला.

विरोधी पक्ष जनतेचे प्रश्न वेगवेगळ्या संसदीय आयुधातून उपस्थित करतो. त्यावेळेस जसा सत्ता पक्ष संवेदनशील असतो त्याचप्रमाणे विरोधी पक्षसुद्धा संवेदनशील असावा लागतो. विरोधी पक्ष आरोप करून मोकळा होतो. परंतु, सत्तापक्षाचे उत्तर ऐकण्याची तसदीही विरोधी पक्षाने घ्यायला हवी. सरकारचे उत्तर ऐकायला विरोधी पक्षातील एकही व्यक्ती नाही. विरोधी पक्षनेता सदनात नाही हे महाराष्ट्राला कळले पाहिजे, असे ते म्हणाले.

सदनामध्ये सत्तापक्षाकडून प्रस्ताव आला किंवा विरोधी पक्षाकडून प्रस्ताव आला तर फक्त टीका करायला उभे रहायचे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. टीका करायची म्हणून टीका केली. पण कधी तरी सरकारच्या चांगल्या कामाची स्तुती करा असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांसातही सरकारने १ रुपयात पीक विमा योजना आणली. विरोधी पक्ष म्हणतो शेतकऱ्यांवर हा बोझा का? आम्ही तो १ रुपयाही कमी करू. शेतकऱ्यांना एक रुपयाचाही बोझा येईल असे काही सरकार करणार नाही. कोणताही शेतकरी कोणत्याही योजनेपासून वंचित रहाणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होईल आणि विमा कंपनीला फायदा होईल अशी कोणतीही योजना सरकार आणणार नाही असे कृषिमंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.